बॅण्ड व डीजेवर नाचणे आदिवासी संस्कृती नाही- सुशिलकुमार पावरा
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा: ९ ऑगस्ट २०२५ रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहादा शहरात क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक ते छत्रपती शिवाजीमहाराज स्मारक पर्यंत आदिवासी पारंपरिक वाद्य व वेशभूषेत वाजत गाजत नाचत आदिवासी सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात आली.क्रांतिवीर बिरसा मुंडा,वीर एकलव्य, राणी झलकारीबाई यांची बालकलाकारांनी भूमिका साकारली. या मिरवणुकीत आमदार राजेश पाडवी व आमदार चंद्रकांत रघूवंशी यांना बॅन्ड व डीजे आणून बोलवणा-या संघटनांना वगळण्यात आले.शहादा येथील क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक येथील आमदार राजेश पाडवी यांच्या पूजन कार्यक्रमात बिरसा फायटर्स संघटनेने सहभाग नोंदवला नाही.एका बाजूला आमदार राजेश पाडवी यांचा कार्यक्रम सुरू असतांना दुस-या बाजूने सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात आली.
विश्व आदिवासी दिनानिमित्त बॅन्ड व डीजेवर नाचणे ही आमची आदिवासी संस्कृती नाही.काही पुढारी बॅन्ड व डीजे आणण्यासाठी लाखो रूपये आयोजकांना देतात व गर्दी जमवतात व गर्दीचा फायदा घेत मोठे भाषण ठोकतात. आदिवासी संस्कृतीला बिघडवण्याचे काम करतात, आदिवासी संस्कृतीपासून तरूणांना दिशाहीन करतात. त्यामुळे तरूण मंडळी आदिवासी पारंपरिक वाद्य ,वेशभूषा व संस्कृती विसरत चालले आहेत. आदिवासी संस्कृती टिकवण्यासाठी व संसकृतीचे जतन करण्यासाठी आम्ही सांस्कृतिक मिरवणूक काढली आहे.अशी प्रतिक्रिया सुशिलकुमार पावरा यांनी दिली.
या सांस्कृतिक मिरवणूक बिरसा फायटर्स,अखिल भारतीय पावरा बारेला संघटना,पावरा समाज उन्नती मंडळ संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अखिल भारतीय पावरा बारेला संघटनेचे अध्यक्ष नामदेव पटले,जेलसिंग पावरा,सखाराम मोते,पावरा समाज उन्नती मंडळचे अध्यक्ष सुरेश मोरे,करण तडवी,रामसिंग डुडवे,प्राध्यापक के.डी,पवार, भरत वलवके, जगदीश पवार, ईश्वर साळूंखे, रामदास जाधव, राजू डुडवे,रामसिंग डुडवे,वसंत पावरा,मनोहर पावरा,राजाराम रावताळे, विक्रम पावरा, बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,ॲड. राहूल कुवर, रोहीदास वळवी,पंकज वळवी,अजय वळवी,बिरसा फायटर्स गाव शाखा शहाणा,वडगांव,कोळपांढरी, पिंपर्डे, खैरवे-भडगांव,गणोर,मलगांव, प्रभूदत्तनगर,मालदा,बिलीचापडा ,चांदसूर्या, बंधारा बुजूर्ग गांवातील कार्यकर्ते व आदिवासी महिला,बालकलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज ढोल ,मांदल, पेपा-या अशा पारंपरिक वाद्यावर आपण मिरवणुक काढली म्हणून तरूण कमी आले आणि नंदूरबार ला २५ पेक्षा अधिक बॅन्ड होते,म्हणून सगळे तरूण तिकडे गेले.आजच्या तरूणांना आपले आदिवासी वाद्य कोणते व संस्कृती कोणती आहे? हे पटवून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.अशी प्रतिक्रिया नामदेव पटले यांनी दिली. आमदार समर्थकही शेवटच्या क्षणी आदिवासी सांस्कृतिक मिरवणूकीत सहभागी झाले.
0 टिप्पण्या