Ticker

6/recent/ticker-posts

उपेंद्र काळेगोरे यांची यु.बी.टी.च्या युवासेना लातूर जिल्हा समन्वयक पदी निवड

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-उदगीर तालुक्यातील हाळी येथील लोकप्रिय ग्रा.पं.सदस्य तसेच ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक म्हणून उपेंद्र काळेगोरे यांची ओळख आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांची युवा सेना जिल्हा मुख्य समन्वयकपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.पक्षात अनेक प्रस्थापित असतानाही एका सामान्य सैनिकाला व अल्पसंख्याक समुदायातील युवकाला हे पद दिल्याने समस्त हाळीकरांसह परिसरातुन उपेंद्रचे कौतूक तसेच अभिनंदन होत आहे.तसेच गावात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
उपेंद्र काळेगोरे यांनी विद्यार्थी सेनेपासून काम करत असतांना विविध प्रकारचे उपक्रम राबवतात. तसेच युवासेनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत असताना कोरोनाच्या महामारीमध्ये गरजू महिलांना साड्या वाटप केले.तसेच वेळोवेळी सामाजिक कार्यक्रम घेऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाज बांधवांना सहकार्य केले. त्यांच्या कारकिर्दीत ७० शिक्षकांना युवासेनेच्या माध्यमातून कर्तुत्ववान शिक्षकांना  पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांसाठी आयोजित मॉक टेस्ट परीक्षा उदगीर मध्ये आयोजित करुन तालुक्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे काम केल.
    विशेषत: कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरात त्यांचा जन्म झाला असून त्यांच्या समाजसेवेच्या आवडीमुळे त्यांनी राजकारणाला सुरुवात करून ग्रामपंचायत निवडणूक लढवली या निवडणुकीत जनतेने त्यांना मोठ्या मतांच्या फरकाने विजय मिळवून दिला. शिवसेना पक्ष फुटी नंतर त्यांनी निष्ठेला जागत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे पक्षाचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्या राजकीय जिवनाची सुरवात हाळी येथील युवा सेना शाखाप्रमुख, युवा सेना तालुका समन्वयक, युवा सेना तालुका प्रमुख,युवा सेना युवा उपजिल्हाधिकारी अशा विविध पदावर त्यांनी काम केले आहे. त्याच अनुभवातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हासमन्वयक प्रमुखपदी पक्ष प्रमुखानी निवड केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या