Ticker

6/recent/ticker-posts

भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलची बैठक संपन्न

✍️ भवन लिल्हारे मो. नं. 9373472847


भंडारा : दिनांक १०/०८/२०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनसंपर्क कार्यालय, भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक सेलची सभा सायं. ५.०० वाजता आयोजित करण्यात आली. यावेळी मंचावर उपस्थितांमध्ये, अल्संख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. इद्रीस नायकवडी, जिल्हाध्यक्ष श्री. नाना पंचबुध्दे, प्रदेश महासचिव श्री. धनंजय दलाल, प्रदेश प्रसिध्दी प्रमुख हसीन अख्तर, समन्वयक ताहीर बेग उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे यांनी तसेच श्री. परवेज पटेल यांनी मार्गदर्शन केले. आमदार श्री. इद्रीस नायकवडी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वागीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटीबध्द आहे असे प्रतिपादन केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार श्री. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केवळ घोषणाबाजी न करता अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी ठोस कृती करत आहे. अल्पसंख्याक समाजाचा सर्वागीण सशक्तीकरण करण्याकरीता व पक्षाशी त्यांचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आगामी काळातील धोरणात्मक पावले उचलण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करीत आहे. असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सोहेल अहमद यांनी अल्पसंख्याक समाजाच्या विविध अडचणी मांडल्या, त्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन श्री. इद्रीस नायकवडी यांनी दिले. याप्रसंगी उपस्थितांमध्ये सर्वश्री जिल्हाध्यक्ष राजु पटेल, भंडारा शहर महासचिव लियाकत खान, मलीक पठाण, डॉ. जावेद कादरी, प्रदीप सुखदेवे, हेमंत महाकाळकर, रिजवान खान, शेख इब्राहीम, अ कलाम शेख, उमेश ठाकरे, मुश्ताक हाजी सलाम, जुनेद कुरेशी, गुडडू, शाहरुख ताहीर शेख, जवाहर निर्वाण, संजय वरगंटीवार, सोनु खोब्रागडे, लिलाधर मते, सुलतान अंसारी, शमीम खान, बंटी चाचेरे, गुलाब उके, विनोद चावके, फिरोज खान, इरफान शेख, सलमान शेख, महेंद्र वाहाणे, शफिक अंसारी, रऊफ पठाण, अ. रहेमान अंसारी, बंटी चाचेरे, जोगा शेंडे, इब्राइम खान पठान, सैफउल्ला पठाण, समीर नजीर शेख, अहफाज खाँ पठान, अजहर, मोहसीन शेख, सैय्यद इमरान, रिजवान, सलमान, उजेर, तौसीफ खान व फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या