अशोक उईके यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची बिरसा फायटर्सची मागणी
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा:९ ऑगस्ट २०२५ हा जागतिक आदिवासी दिन मी साजरा करणार नाही,असे बेताल वक्तव्य करणा-या महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे..असे बेताल वक्तव्य करणा-या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,जगदीश डुडवे, जितेंद्र भंडारी,जंत्र्या पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
संयुक्त राष्ट्र संघाने १९९३ रोजी आदिवासींच्या सन्मानार्थ ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केलेला आहे.देशभरात ९ ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.आदिवासी दिनानिमित्त राज्यातील आदिवासी बहूल सर्व जिल्ह्य़ात ,तालुक्यात,गावात सांस्कृतिक देखावे, रॅली,मेळावे,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.ऐवढेच नाही तर काही जिल्ह्यात आदिवासींचे हक्क व अधिकारासाठी आंदोलने व मोर्चे काढले जातात.
संपूर्ण विश्वात ९ ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात आदिवासी समुहाच्या साजरा केला जात असतांना महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मी आदिवासी दिवस साजरा करणार नाही ,असे निंदनीय वक्तव्य केले आहे.अशोक उईके हे प्राध्यापक म्हणून आदिवासी समाजाच्या आरक्षणावर नोकरीला लागले आहेत व आदिवासी मंत्री सुद्धा आदिवासी आरक्षणाच्या आधारेच झाले आहेत, याचे भान मंत्री विसरले आहेत. अशोक उईके यांच्या या बेताल वक्तव्य मुळे संपूर्ण आदिवासी समाजात संताप निर्माण झाला आहे.आदिवासी समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. म्हणून आदिवासी विकास मंत्री श्री.अशोक उईके यांनी आदिवासी समाजाची तात्काळ माफी मागावी .
0 टिप्पण्या