Ticker

6/recent/ticker-posts

बहीण-भावाच्या प्रेमाच्या अतुट धाग्यांनी सजली हंडरगुळी येथील दुकाणे.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-बहीण-भावाच्या पविञ नात्याचा सण म्हणुन ओळखला जाणारा रक्षाबंधन हा सण अवघ्या कांही दिवसावर येऊन ठेपला असल्याने हंडरगुळीत असलेले जनरल स्टोर्स आकर्षक व रंगीबेरंगी राख्यांनी सजलेले दिसतात.बहिण-भावाच्या पविञ नात्याचे प्रतिक असलेल्या राखीपोर्णिमा (रक्षाबंधन) या सणास हिंन्दुधर्मियांमध्ये खुप म्हत्व असते. या दिवशी बहिण आपला लाडोबा असलेल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि भावाच्या उज्वल,उदंड आयुष्यासाठी इश्वरांकडे प्रार्थना करुन त्या लाडोबा भावाला औक्षण करते अन् ओवाळीते.
सध्या हा सण अवघ्या कांही दिवसा वर येऊन ठेपला असल्याने जनरल स्टोर्स रंगीबेरंगी व आकर्षक राख्यांने सजलेले दिसतात.या विज्ञानतंञज्ञान च्या जमान्यात आधुनिक राख्यांसह पारंपारिक राख्यांनाही बहिणींकडून पसंती मिळत आहे.तसेच मागच्या वर्षीपेक्षा यंदा दरात वाढ झाली तरी सुध्दा लहानग्या भावाला सोबत घेत त्याच्या आवडी प्रमाणे नवनवीन डिझाईनच्या सुंदर राख्या घेताना दिसतात.
यंदा दि.९ रोजी असलेल्या आणि भावा-बहिणींच्या नात्यात अतुटता व प्रेमाचा गोडवा,आपुलकी आणणारा सण म्हणुन रक्षाबंधन या सणाकडे पाहिले जाते.पुर्वी भल्यामोठ्या अन् मनगट तथा हात भरवुन टाकणा-या राख्या भावांसह बहिणींचीही पहिली पसंत होती.पण कालांतराने गोल,गोल असलेल्या मोठ्या राख्यांऐवजी मोरपंखी,स्टोनसह  विविध रंगाच्या आकर्षक दिसणा-या राख्या यांनाही बहिणी डिमांड देतात.
४८ रुपये डझन ते ३६० रुपये डझन असा दर आहे.तसेच यंदा कांही प्रमाणात दर वाढले आहेत. तसेच आकर्षक दिसणा-या राख्यांना मागणी आहे.
अशी माहिती बालाजी कोटगीरे,विक्रेता,हंडरगुळी  यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना दिली..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या