चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-०६ ऑगस्ट २०२५ रोजी पोलीस स्टेशन, वाढवणा व शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हंडरगुळी ता. उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांचे हक्क व सुरक्षितता, महिलांची सुरक्षा याबद्दल जनजागृती अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष या प्रशालेचे मुख्याध्यापक सय्यद रफिक यांनी बालकांची सुरक्षा याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी वाढवणा पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी संजय कलकत्ते, शिवप्रताप रंगवाळ, दत्तात्रय वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी विद्यार्थांना महिलांची सुरक्षा व कायदे यांच्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयातील प्रा.डॉ. सौ. नारागुडे के.पी. यांनी "गुड टच, बॅड टच" या विषयी माहिती दिली. व समस्येचे निराकरण करण्यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात या विषयी सखोल माहिती दिली. त्यानंतर प्रशालेचे पर्यवेक्षक (स्काऊट मास्टर) सुगावे बालाजी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता व हक्क,सायबर सुरक्षा, गुड टच,बॅड टच,विषयी सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांना काही समस्या आल्यास टोल. फ्री. क्रमांक ११२ व १९३० या नंबरवरती संपर्क साधावा. या कार्यक्रमाचे प्रास्तविक रामचंद्र घटकार, सुत्रसंचलन व आभार सौ.गुडाप्पे आर.एस यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक कार्लेवाड मधुकर, रमन माने, दत्ता माने, चंद्रकांत शाहीर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशालेतीलसौ. बिरादार के.के, ,सौ. कनकुरे एम.एम, सौ. गायकवाड पी.एन, सौ. येलाले के.व्ही. कुरुळेकर एस.एन, सुमयाँ तांबोळी, सौ. जवळे जे. आर, सौ. संगमवार एस.टी, सौ. भंडारे एस.जी, सौ. डावळे एम.ए, सौ. विशाखा कांबळे, जाधव रविप्रकाश, नाटकरे बालाजी, गायकवाड संजय, मैलारे एम.टी, पाटील राजकुमार, कणसे व्ही.एस, कणसे व्यंकटराव, गायकवाड भिमकिरण, मळभागे शिवानंद, माधव वाघमारे, कासले वैभव, भोसले अभिजित, विनित सुर्यवंशी, श्रीमती शेख ए. वाय ग्रंथपाल, श्रीमती बिरादार राजश्री उपस्थित होते. विद्यालयातील सर्व विद्यार्थी व जेष्ठ नागरिक, युवक, युवती उपस्थित होते.
0 टिप्पण्या