Ticker

6/recent/ticker-posts

डोलारा प्रभागातील रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी


बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पाक्षाद्वारे मुख्याधिकारी    नगरपरिषद भद्रावती यांना निवेदन देण्यात आले.



चित्रा न्युज प्रतिनिधी 

भद्रावती : शहरातील डोलारा प्रभागातील ज्योती झेरॉक्स जवळ सुरज मेश्राम यांच्या दुकाना समोरील रस्ता गेल्या तिन वर्षापासून अतिशय खराब अवस्थेत असुन, त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा भद्रावती. तर्फे  मुख्याधिकारी नगरपरिषद भद्रावती यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 यावेळी वरोरा - भद्रावती विधानसभा अध्यक्ष विकास दुर्योधन, भद्रावती शहर महासचिव मिलिंद राहुलगडे, शहर सचिव स्वप्नील कोल्हटकर, उपस्थित होते. पक्षाचे पदाधिकारी यांनी. सांगितले की सदर रस्ता गेल्या तिन वर्षापासून दुरुस्त न झाल्याने मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या खड्यामध्ये पाणी साचुन वाहणचालक, पादचारी आणि शालेय मुलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. येथे अनेक लहान मोठे अपघात झाल्याचे सांगितलं जात आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी करुनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्याची अजून डागडुजी न झाल्याबद्दल नागरिकांत नाराजीचा सुर आहे. सदर निवेदनाद्वारे पक्षाने हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे.अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा हि देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या