Ticker

6/recent/ticker-posts

हिमायतनगर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना आमदार कोहळीकर यांच्या हस्ते तहसील कार्यालय येथे अनुदान वाटप


- सोयाबीन पिक नुकसानीसाठी ४५ पैशेवारी आनेवारी जाहीर...

लिंगोजी कदम  जिल्हा प्रतिनीधी ग्रामिण नांदेड          

नांदेड :-हिमायतनगर शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरांची पडझड, शेतीचे आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने तालुक्यातील नागरिकांना शासनाने दिलासा देण्यास सुरुवात केली आहे. शासनाच्या वतीने आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी हिमायतनगर शहरातील तहसील कार्यालय येथे हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते सानुगृह अनुदान व अतिवृष्टी ग्रस्तांना धनादेशाचे वाटप आणि पिक नुकसानीसाठी आनेवारी जाहीर करून आमदार कोहळीकर यांनी हदगाव उपविभागीय अधिकारी व हिमायतनगर तहसीलदार यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना मदत दिली

हिमायतनगर शहरातील नगरपंचायत अंतर्गत व पंचायत समिती कार्यालय अंतर्गत तालुक्यातील  अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलेल्या एकूण १३० नागरिकांपैकी ९८ लाभार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे सानुगृह अनुदान आज आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच अंशतः घर पडझड झालेल्यांना ४ हजार रुपये साहाय्य मिळाले. तर पूर्णतः घर पडझड झालेल्या १८ नागरिकांना प्रमाणपत्रांचे वाटप करून त्यांचा निधीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली यावेळी सरसम, जवळगाव, व हिमायतनगर मंडळातील सहा-सहा गावांतील सोयाबीन पिकांचे नमुने घेऊन आनेवारी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात महत्त्वाचे म्हणजे या पाहणी व पंचनाम्यानंतर पिक नुकसानीसाठी विमा ठरविण्यात येणार आहे महत्वाचे म्हणजे तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी या कार्यक्रमात जाहीर केले की, “हिमायतनगर तालुक्याची अधिकृत ४५ पैशेवारी आनेवारी निश्चित करण्यात आली असून यावरून शेतकऱ्यांना विमा व नुकसानभरपाई मिळणार आहे.”या वितरण कार्यक्रमास आमदार बाबुराव कदम कोहळीकर, विभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्यासह तालुक्यातील मान्यवर उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गोपाल भाऊ सारडा, नांदेड जिल्हा माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख सरसमकर, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, विकास पाटील देवसरकर, राम सूर्यवंशी, राजू पाटील शेलोडेकर, हिमायतनगर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मोहंमद जावेद, माजी नगरसेवक प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते सदाशिव सातव, शहर प्रमुख गजानन हरडपकर, फेरोज खुरेशी, युवा सेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पुठ्ठेवाड  करंजीकर ,गजानन अनगुलवार, गौरव  पाटील ,अफरोज शेख शरद पाटील हारडपकर ,सह आदीं जण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या