चित्रा न्युज प्रतिनिधी 
करमाळा:- सन २०२४-२५ मध्ये कंपनीचे सर्वाधिक मोबाईल विक्री केल्याबद्दल विव्हो कंपनीच्या वतीने शहरातील श्री बनशंकरी शॉपी मध्ये कार्यरत असलेले युवराज जगताप यांना बेस्ट सेलर अवार्ड देण्यात आला. शनिवार दि. २७ रोजी टेंभुर्णी येथील सेल्स मॅनेजर ची बैठकीत हा मानाचा किताब मिळवला. गेल्या वीस वर्षांपासून करमाळ्यातील श्री बनशंकरी मोबाईल शॉपी मोबाईल विक्रीत अग्रगण्य मानली जाते. या शॉपीच्या माध्यमातून शहर व तालुक्यासह अनेक ग्राहक विवो कंपनीच्या मोबाईल हँडसेटचा अनुभव घेत आले आहेत. कंपनीच्या सर्व ऑफर्स बनशंकरी मोबाईलच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याने तसेच कंपनीचा दर्जा आणि अद्ययावत सुधारणेमुळे विव्होला ग्राहकांची विशेष पसंती दिसून येते. ग्राहकांना सौजन्याच्या वागणूकीसह त्यांच्या अपेक्षित बजेट आणि फिचर्स नुसार हँडसेट सुचविला जातो. त्यामुळे मोबाईल घेण्यासाठी ग्राहकांचा बनशंकरी मोबाईल शॉपीकडे विशेष कल असतो.यामुळेच बनशंकरी मोबाईल शाॅपी चे मालक बसवराज चिवटे हे काही महिन्यांपूर्वी विव्हो कंपनीच्या बेस्ट सेलर अवार्ड साठी पात्र ठरले असून कंपनीच्या मानाच्या व्हीआयपी क्लब मध्ये स्थान मिळवले आहे. तर आज युवराज ह्यांना मिळालेल्या पारितोषिका मुळे बनशंकरी मोबाईल शॉपी चे नाव अजून मोठे होत आहे. त्यामुळे शॉपिचे मालक शिवराज चिवटे, बसवराज चिवटे यांनी अभिनंदन केले असून शहर व तालुक्यातील सर्व मोबाईल डिलरसह ग्राहकांकडून बनशंकरी मोबाईल शॉपीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.