चित्रा न्युज प्रतिनिधी
तळेगाव दशासर :-स्थानिक श्री दत्त सार्वजनिक वाचनालय याच्या वतीने पोलीस भरती सराव परीक्षेचे आयोजन 14 सप्टेंबर रविवार रोजी जि. प.माध्यमिक शाळा व कानिष्ठ महाविद्यालय येथे करण्यात आले होते. यामध्ये अमरावती, यवतमाळ, वाशीम, वरुड व जिल्हातील एकूण 190 विध्यार्थी सहभागी झाले.या पोलीस भरती सराव परीक्षेत पुरुष गट व महिला गट असे दोन गट करण्यात आले. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस ठेवण्यात आले. पुरुष गट प्रथम बक्षीस योगेश विजयराव तापस (वनविभाग अधिकारी )यांचे कडून द्वितीय बक्षीस आकाश सुरेश कावळे यांचे कडून तृतीय बक्षीस श्री दत्त सार्वजनिक वाचनालय तसेच महिला गटा मध्ये प्रथम बक्षीस लक्षवेध एज्युकेशन अकॅडमी,द्वितीय बक्षीस ग्रामपंचायत कार्यालय व कर्मचारी तसेच तृतीय बक्षीस पोलीस स्टेशन कर्मचारी याच्या कडून देण्यात आले. परीक्षे नंतर प्रमुख अतिथीचे स्वागत करण्यात आले यावेळी डॉ. हर्षल
क्षीरसागर, दुय्यम ठाणेदार वानखडे, यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या पोलीस भरती सराव परीक्षेमध्ये पुरुष गटामध्ये प्रथम बक्षीस साहिल फुले वरुड, द्वितीय बक्षीस अमित भुंजाळे अमरावती, तसेच तृतीय बक्षीस निलेश फड, अजय चौकडे, व आशिष खरासे यांना देण्यात आले. महिला गटात प्रथम बक्षीस प्राजक्ता लाखे अमरावती,
द्वितीय बक्षीस पल्लवी मडप वाशीम व तृतीय भारती चन्नव कवठा कडू यांना देण्यात आले बक्षीस वितरण दुय्यम ठाणेदार वानखडे, डॉ. हर्षल क्षीरसागर, डॉ. विवेक सुदेवाड, सरपंच मीनाक्षी ठाकरे, नरेंद्र रामावत,शितल लोया,रमाकांत इंगोले व पत्रकार यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन श्याम घाटे यांनी केले या पोलीस भरती सराव परीक्षेला यशस्वी करण्याकरिता श्री. दत्त सार्वजनिक वाचनालय, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, आम्ही मावळे ग्रुप तळेगाव दशासर व गावाकऱ्यांचे सहकार्य लाभले.


0 टिप्पण्या