Ticker

6/recent/ticker-posts

परजना येथे सकल मराठा समाज बांधवांन कडून मिरवणूक काढून मोठ्या हर्ष उत्साहात जल्लोष साजरा..!

अखेर आरक्षणाचा तिढा सुटला; संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रयत्नाला यश, परजना व गिरगावात फटाके फोडून, ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा..

 श्रीकांत बाराहाते जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण  हिंगोली 

हिंगोली:- जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील परजना व गिरगावात मनोज दादा जरांगे यांच्या सततच्या पाठपुराव्यानिशी केलेल्या आपल्या एकनिष्ठ कर्तव्यात निःसंकोचपणे प्रयत्नशील कृत्यज्ञतेत यश संपादन मिळाल्याने सर्व सकल मराठा समाज बांधवांन कडून एका संघर्षाला यश आल्या कारणाने प्रत्येकाच्या मना मनात आनंद व्यक्त होतांना यावेळी आपल्याला यावेळी दिसत आहे.
तर यावेळी परजना पाटीपासून ते गावात शेकडो समाज बांधवांनी गिरगाव रोड, परजना पाटी पासून गुलाल उधळीत मोठ्या हर्ष उत्साहात मिरवणुक काढण्यात आली. तर यावेळी मिरवणुकी मध्ये मोठ्या प्रमाणात तरूण युवक, शालेय विद्यार्थी व मराठा समाज बांधव यांचा शेकडोंच्या संखेने समावेश होता.

तर यावेळी परजना,व गिरगाव येथील मराठा बांधव मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी गेलेल्या तरुण युवक व सकल मराठा समाज बांधवांनचा गावात सरपंच,पोलीस पाटील, तसेच प्रतिष्ठित नागरिक शालेय विद्यार्थी, पालक वर्ग, समाजातील माता भगिनींनी त्यांची आरती ओवाळून विविध प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते पुष्पगुच्छ व फुलांची माळ अर्पण करून त्यांचं गावकऱ्यांनी मनोमनी आभार व्यक्त करून गेलेल्या सर्व सकल मराठा बांधवांच परजना व गिरगावात जल्लोषा दरम्यान स्वागत करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या