Ticker

6/recent/ticker-posts

पळसपुर डोलारि सिरपली रस्त्याच्या झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची गुण नियंत्रण विभागाकडुन चौकशी करुन दोषींवर कारवाई करा. मिडिया संपादक पत्रकार संघटना हिमायतनगर तालुका अध्यक्ष नागोराव शिंदे पळसपुरकर यांनी केली पत्राद्वारे कार्यकारी अभियंत्याकडे मागणी .


लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड 

हिमायतनगर -     तालुक्यातील पळसपुर डोलारी सिरपली रा.मा.259 एकंबा, शेलोडा, सिरपली, डोल्हारी, पळसपुर, हिमायतनगर, पार्डी, एकघरी, वाशी अंतर्गत रस्ता 5/075ते17/065एकुन लांबी11.990की.मी.या कामासाठी 7 कोटी.  30. लक्ष रुपयाचा निधी चार वर्षांपुर्वी मंजूर झाला होता  तत्कालीन हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी या रस्त्यासह पुलाचे मोठ्या थाटात उद्घाटन करुन मोकळे झाले परंतु आज पर्यंत हा रस्ता पूर्णत्वास गेला नसल्याने या रस्त्यावरिल नागरिकांचे हाल लक्षात घेता मिडिया संपादक पत्रकार संघटना हिमायतनगर तालुका अध्यक्ष नागोराव शिंदे पळसपुरकर यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंता मत्ते यांच्या कडे पत्राद्वारे केली असता या पत्रात नागोराव शिदे यांनी असे म्हटले आहे की (औरंगाबाद) सभांजिनगर येथील गुत्तेदार एम ए सिद्दिकी यांनी तिनं वर्षा पूर्वी या रस्त्याच्या कामाचे टेंडर घेतले होते त्या कामात रस्त्यावरील पुलाचे काम करुन देण्याचि तरतूद असताना सुद्धा आजपर्यंत या रस्त्यावर पुलाचे काम न झाल्याने दिनांक 15 रोजी नडवा पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने चातारि येथील दुचाकी स्वार पाण्यात रस्त्याचा अंदाज आला नसल्याने पडला ते बालंबाल बचावला  असल्याने या रस्त्याचे काम व पुलांचे काम अतीशय निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याने दोन महिन्यांत केलेल्या कामाचे पीतळ उघडे पडले आहे या रस्त्याची पाहणी केल्यावर दिसुन येईल चार वर्षांपासून सुरू केलेले काम यावर्षी एप्रिल, मे, महिन्यात घाई गडबडीत काम करुन बिल उचलुन घेतले असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे या कामाचे कंत्राट एम ए सिद्दीकी छ.संभाजी नगर यांनी वेळेत काम पूर्ण केले नाही या उलट आता पर्यंत काम अतीशय बोगस काम शासनाच्या अंदाज पत्रकाला बगल देऊन निकृष्ट दर्जाचे काम उरकण्यात आले या निकृष्ट दर्जाचे झालेल्या कामाची गुण नियंत्रण विभागाकडुन तक्रारदारा समक्ष चौकशी करावी तसेच आता पर्यंत झालेल्या कामाचे देयक व रस्त्यावर  असलेल्या कामांची पडताळणी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयाकडून विलंब झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नागोराव शिंदे पळसपुरकर,संतोष पाटील कदम डोल्हारी यांनी मागणी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या