Ticker

6/recent/ticker-posts

शहादा येथे २० सप्टेंबरला आदिवासींचा ऊलगुलान जन आक्रोश मोर्चा

प्रांत अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
शहादा : हैद्राबाद गॅझेटच्या आधारे धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देवू नये व आदिवासींच्या इतर मागण्यांसाठी शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ठिक १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पासून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर्यंत समस्त आदिवासी समाज तालुका शहादा तर्फे आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा निघणार आहे.मोर्चाचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय अधिकारी शहादा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांना दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी,नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,सुरेश पवार, मुकेश पावरा,पप्पू अवाया,राकेश मोरे,पवन पवार, विजय बरडे,निलेश बरडे,रामदास मुसळदे, गोविंद पावरा,अर्जून पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                   आदिवासींचे आरक्षण हे संविधानिक असुन आदिवासी समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण हे भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीनूसार देण्यात आले आहे.परंतू मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर धनगर व बंजारा समाजाचे लोक हे हैद्राबाद गॅजेटच्या आधारे अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनुसूचित जमातीची यादी बदलण्याचा अधिकार हा फक्त राष्ट्रपती व भारतीय संसदेस आहे. राज्य सरकारला गॅजेटचा संदर्भ घेऊन अनुसूचित जमातीत अन्य जातीची घुसखोरी करण्याचा अधिकार नाही. हैद्राबाद गॅझेट ला कोणतेही कायदेशीर किंवा संविधानिक बळ नाही.म्हणून हैद्राबाद गॅझेट च्या आधारे धनगर व बंजारा समाजाच्या लोकांना आदिवासींत आरक्षण देवू नयेत व इतर मागण्यांसाठी शहादा येथे २० सप्टेंबर २०२५ रोजी आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.या जन आक्रोश मोर्चात नंदूरबार जिल्ह्य़ातील सर्वच आदिवासी समाज बांधवांनी,नोकरदार वर्ग,सर्वच पक्षातील आदिवासी कार्यकर्त्यांनी,सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे जाहीर आवाहन बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या