Ticker

6/recent/ticker-posts

नेरी पुनर्वसन येथील नालंदा बुद्ध विहारांमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिके अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले


चित्रा न्युज प्रतिनिधी 
वर्धा:-माननीय विलास काळबांडे उपाध्यक्ष संस्कार विभाग भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा यांची कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका.
61 व्या जन्मदिवसाच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 16 सप्टेंबर 2025 ला करण्यात आले.


नेरी पुनर्वसन येथील नालंदा बुद्ध विहारांमध्ये वर्षावास प्रवचन मालिके अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे  जिल्हा संघटक रमेश जी जोगे, राजाभाऊ कांबळे, हिशोब तपासणीस भारतीय बौद्ध महासभा आर्वी तालुका.
भास्करराव पाटील, सुलोचना कांबळे
 माननीय सरला सोनटक्के महिला आघाडी अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा
भारतीय बौद्ध महासभेचे आर्वी तालुकाध्यक्ष मधुकर सवाळे
संघटक सुरेश भिवगडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित 
बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित परीक्षेचे आयोजन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने  करण्यात आले आहे त्याबाबत मार्गदर्शन मान. 
रमेश जोगे यांनी केले
मान. मधुकरराव सवाळे यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म होय.
यावर मार्गदर्शन केले. 
मान. सुरेश भिवगडे यांनी विलास काळबांडे यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग व नेरी गावातील आंबेडकरी चळवळीचा इतिहास विशद केला.या कार्यक्रमाचे आभार विलास काळबांडे यांनी मानले. नेरी पुनर्वसन या गावातील  महिला मंडळ उपासक उपासिका यांची या कार्यक्रमाला  प्रामुख्याने उपस्थिती होती.याप्रसंगी कविता काळबांडे मंदा काळपांडे लता काळे विजया काळबांडे सुजाता काळबांडे ज्योती बनसोड स्वाती काळबांडे, दुर्योधन सहारे त्रिशूल काळबांडे
स्मिता काळबांडे इत्यादींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या