Ticker

6/recent/ticker-posts

कृषि उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकलूज : कृषि उत्पन्न बाजार समितीने बदलत्या काळानुरूप आधुनिकीकरणाचे धोरणानुसार नवनवीन उपक्रम हाती घेत उत्पन्नामध्ये दिवसेंदिवस वाढ केली असून राज्यात आठवा क्रमांक मिळविला आहे समितीने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार प्राप्त झाल्याचे सभापती मदन सिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. 
  
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. मोहिते पाटील पुढे म्हणाले, बदलत्या काळाबरोबर विविध क्षेत्रात होत असलेल्या बदलाप्रमाणे ही बाजार समितीने आधुनिकीकरणाचे धोरणानुसार आधुनिक उपक्रम हाती घेत उत्पन्नामध्ये दिवसेंदिवस वाढ केलेली आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये ४०० कोटी रूपयांची उलाढाल झालेली असून ४ कोटी उत्पन्न मिळाले आहे व १ कोटी १६ लाख वाढावा झाला आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाची क्रमवारी महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेली आहे. महाराष्ट्रात ३०५ बाजार समित्यांमध्ये या बाजार समितीचा ८ वा क्रमांक आलेला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्रात उत्कृष्ट कार्य करणा-या बाजार समितीस वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येते. सदरचा पुरस्कार या बाजार समितीस प्राप्त झाला आहे ‌अहवाल सालात जनावरे शेडमध्ये काँक्रीटीकरण, गटारे, कार्यालय नुतनीकरण, आर.ओ. प्लॅन्ट्र, स्वच्छतागृह, अंतर्गत रस्ते, सोलर सिस्टीम, सी.एन.जी.पंप, पेट्रोलपंपाकरीता टँकर आदी विकास कार्ये करण्यात आली. चालू वर्षामध्ये केळी मार्केटचे लिलाव चालू करण्यात येणार असून टोमॅटो मार्केटही लवकरच सुरू करणार आहोत. नातेपुते येथे पेट्रोलपंप, अकलूज येथे सेलहॉल, कोल्ड स्टोरेज, सौरऊर्जा, माळशिरस येथे आर. ओ. प्लॅन्ट् उभा करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी पेट्रोलपंप अकलूज येथे ई-चार्जिंग स्टेशनचे उदघाटन करण्यात आले. तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलार इत्मादी बाजार घटकांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समिती प्रयत्मशिल आहे. शेतकरी आपल्या उत्पादित शेतीमालाची विक्री मार्केटमध्ये उघड लिलाव पद्ध‌तीने करून आपला शेतीमालाला योग्स बाजारभाव मिळावा व बाजार समितीस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. शेतकरी, व्यापारी, संचालक मंडळ, सचिव, कर्मचारी यांच्या एकत्रित योगदानाने अकलूज बाजार समिती एक आदर्श बाजार समिती म्हणून ओळखली जाते. सभेसाठी  बापूराव पांढरे, उपसभापती, शहाजीराव (बाबाराजे) देशमुख, मा.जि. उपाध्यक्ष, संचालक मंडळ, विकास सेवा संस्था, ग्रामपंचायत, व्यापारी, हमाल व तोलार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषय वाचन सचिव राजेंद्र काकडे यांनी केले. श्रद्धांजलीचा ठराव संचालक नितीन सावंत यांनी मांडला तर आभार संचालक मारूतराव रूपनवर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या