चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : मोरवा ग्रामपंचायत येथे ग्राम विकास व पंचायत राज विभागांतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या कार्यक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आमदार किशोर जोरगेवार चंद्रपुर हे होते.उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या प्रसंगी पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या हस्ते बलून्स आकाशात सोडण्यात आले व कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित विशेष अतिथी म्हणून विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपुर, संगीता भांगरे ( डहाळे ) गटविकास अधिकारी पंचायत समिती चंद्रपुर,पुलकीत सिहं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपुर,धनंजय पाल सह गटविकास अधिकारी पंचायत समिती चंद्रपुर होते.
या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा व दर्जेदार व्यवस्था उपलब्ध करून देणे हा असून या निमित्ताने ग्रामविकासाची दिशा अधिक सक्षम करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी स्नेहा सचिन साव सरपंच ग्रामपंचायत मोरवा, भुषण महादेव पिदुरकर उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य गण तसेच गावातील नागरिक व विभागातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या