सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड : खंडणी उकळणारा, हप्ते मागणारा खोटया अॅट्रॉसिटी करणारा तसेच पोलीसांना शिवीगाळ करुन दमबाजी करणारा गुंड पोपट फुले व त्याचे सथीदार योगेश फुले, नागेश फुले यांना जामखेड पोलीसांनी बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी अटक केली. दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी मानणीय न्यायालय जामखेड यांच्यासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी दिली.
पोपट फुले त्यांचे साथीदार यांचेवर विविध कलमान्वये गंभीर स्वरुपाचा गुन्हा जामखेड पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे. त्यामुळे पोपट फुले व त्याचे साथीदार गुन्हा करुन पळून गेले होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. पोपट फुलेवर याआधीही विविध गुन्हे दखल आहेत.
पोपट फुले यांची डोणगांव गावात मोठी दहशत आहे. पोलीसांनी शुक्रवार दिनांक १० ऑप्टोबर २०२५ रोजी तपासकामी डोणगांव येथे नेउन त्यांची चौकशी केली व गुन्हयात वापरलेले हत्यारे जप्त केली जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक श्री. दशरथ चौधरी व तपास अधिकारी श्री. शिवाजी कदम यांच्या या धडाकेबाज कारवाई चे सर्वत्र कौतुक होत असुन सामान्य जनतेने त्यांचे अभिनंदन केले आहे.


0 टिप्पण्या