उपोषणास अनेक जनतेचा व लोक प्रतिनिधीचा भेट देवुन
पाठिंबा
चित्रा न्युज प्रतिनिधी
मारेगाव : तालुक्यातील वनोजा (देवी) ग्रामपंचायत परिसरातील जनतेच्या कोणत्याही शासकिय समस्या सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करून अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी वनोजा देवी ग्रामपंचायतीचे उपसरपंच तसेच शिवसेना (शिंदे गट )चे उपतालुका प्रमुख प्रशांतभाऊ भंडारी यांनी विविध मागण्यासाठी दि.२९ ऑक्टोंबर पासुन वनोजा देवी चौपाटी येथे मंडप टाकुन आमरण उपोषण सुरु केले आहे.
या उपोषणास मार्डी येथील पोलीस पाटील, डॉ. प्रशांत पाटिल वनोजा देवीचे पोलीस पाटिल दीपक ढवस व डोल डोंगरगावचे पोलीस पाटिल योगेश्वरभाऊ बोडणे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन प्रशांतभाऊ यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा दिला.
गावातील अनेक समस्या वर्षानुवर्षे रस्ते दुरुस्त न होणे, निकृष्ट दर्जाची विकासकामे, पाण्याचा तुटवडा आणि विजेच्या समस्या, पोलीस चौकी, महावितरणचे ३३ केव्ही सब स्टेशन काम तातडीने सुरु करावे, राज्यमार्ग ३१७ वरील जड वाहतूक बंद करावी, सार्वजनिक बांधकाम व जिल्हपरिषद विभागांतर्गत खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती करावी, आरोग्य विभागातील बदल्यामुळे जनतेला होणारा त्रास तातडीने थांबवावा या विविध मागण्यासाठी उपोषण करण्यात आले आहे.
प्रशासनाला वेळोवेळी अनेक समस्यांच्या तक्रारीचे निवेदन देऊनही प्रशासनाला जाग आली नाही.प्रशासनाला जागे करण्यासाठी लक्षवेधी उपोषणाचा मार्ग पतकारत आहे. प्रशासनाच्या उदासीनते विरोधात परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाला कंठाळुन
वनोजा मार्डी परिसरातील महिला,जनता व वनोजा गावकरी,यांनी अवैध दारूबंदी विरोधात गावकरी मिळून मारेगावला पोलीस स्टेशनमध्ये वारंवार निवेदन दिले तरीसुद्धा प्रशासनाला जाग आली नाही याकरीता उपोषणाच्या मार्गाने लढा लढत आहोत प्रशासनाने लवकरात लवकर दखल न घेतल्यास दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ ला आपल्याला चक्काजाम आंदोलन करायचे आहे तरी आपण सर्व वनोजा ग्रामवासी व परिसरातील सर्व नारिकानी चक्काजाम आंदोलनाला करीता मोठ्या संख्येन हजर राहण्याचे आहे. असे उपोषणकरता प्रशांतकुमार भंडारी यांनी सांगितले आहे.
या उपोषणस्थळी शिवसेना शिंदे गटाचे विजय चोरडिया, विनोद मोहितकर, मारेगाव तालुका प्रमुख विशाल किन्हेकर, शहर प्रमुख विजय मेश्राम तसेच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित राहुन प्रशांत भंडारी यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला.
-------------------------------------
आज पक्ष महत्वाचा नाही तर भंडारी यांना सहकार्य करण्याची गरज आहे
नळाला पाणी नाही पण कर वसुली मात्र सुरु आहे. आरोग्य कर घेतात पण आरोग्य कर्मचारी नाही विज कर घेतात पण घराजवळ लाईट नाही. मग टॅक्स भराचा कसा? या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज पक्ष महत्वाचा नाही आज प्रशांतभाऊ भंडारी कामाचा माणूस आज कुणीही कसलाही विचार न करता आपल्या गावातील उपसरपंच भंडारी यांच्यावर उपोषणास बसण्याची वेळ आली आहे. या करीता आपण सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे
रोशन शिंदे मनसे सैनिक वनोजा (देवी)


0 टिप्पण्या