चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा: शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राची ऑनलाईन नोंदणी सुरू करून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी पालकमंत्री यांना अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.
भंडारा जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी धानाची कापणी केलेली आहे मात्र अजून पर्यंत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही.त्यामुळे व्यापारी 1700 ते 1800 रुपये क्विंटल प्रमाणे शेतकऱ्याकडून धान खरेदी करीत आहेत. शेतकरी आर्थिक अडचण असून धान भरून ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव व्यापाऱ्यांना धान विकावे लागत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे,दशरथ शहारे,पुरुषोत्तम गायधने यांनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांना निवेदन दिले.पालकमंत्री यांनी यावर ताबडतोब तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.


0 टिप्पण्या