चित्रा न्युज प्रतिनिधी
यवतमाळ ::दि. २ ऑक्टोबर २०२५ स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या “उदय – व्यसनमुक्त समाज अभियान” या उपक्रमाचा समारोप आज प्राथमिक आरोग्य केंद्र, बेलोरा व ग्रामपंचायत कार्यालय बेलोरा ता.पुसद जि.यवतमाळ येथे झाला.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. राजकुमार भगत, उपाध्यक्ष श्री. शरद खंदारे, तसेच गावातील नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी व्यसनमुक्त समाजाची आवश्यकता अधोरेखित केली आणि या अभियानातून मिळालेल्या संदेशांचा जीवनात अवलंब करण्याचे आवाहन केले.
“उदय – व्यसनमुक्त समाज अभियान” हा उपक्रम दिनांक ५ सप्टेंबर २०२५ शिक्षक दिन पासून सुरू होऊन दिनांक २ ऑक्टोबर २०२५ महात्मा गांधी जयंती पर्यंत सलग एक महिना राबविण्यात आला. या कालावधीत बस-स्टॉप, शाळा, ग्रामपंचायत, सार्वजनिक ठिकाणे अशा विविध ठिकाणी व्यसनमुक्ती शपथ कार्यक्रम व जनजागृती मोहिमा घेण्यात आल्या. हजारो नागरिक, विद्यार्थी, शिक्षक व प्रवासी यांनी या अभियानात सहभागी होऊन व्यसनमुक्त जीवन जगण्याची शपथ घेतली.
या अभियानाद्वारे समाजात आरोग्यदायी जीवनशैली, सकारात्मकता व व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष श्री. राजकुमार भगत, शरद शरद खंदारे, परमेश्वर भगत, संजय पोले, गिरीधर कांबळे सदस्य, मधुकर मस्के, प्रकाश पठाडे, विनोद राठोड, हरी राठोड. उपस्थित होते
राजकुमार भगत यांनी सांगितले की, पुढील काळातही संस्था तसाच उत्साह व तत्परतेने समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करत राहील.


0 टिप्पण्या