Ticker

6/recent/ticker-posts

कुठलाही आदेश नसताना अनेक कंपण्यांचा बोगस फेरफार एका दिवसात कसा काय करतात - विनोद खोब्रागडे यांचा रोखठोक सवाल.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती :  दिनांक ०७/१०/२०२५ रोजी अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात अनेक कंपन्यांचा बोगस फेरफार एका दिवसात कुठलाही आदेश नसताना कसा केला त्या विरुद्ध सुनावणी आहे.
एकीकडे कोर्टाचा आदेश राहुनही, अनेक वर्षांपासून  महसूल अधिकारी यांनी फेरफार केले नाही, अखेर विष प्राशन करून शेतकरी परमेश्वर मेश्राम मरण पावला. तर,दुसरीकडे भद्रावती तालुक्यातील अनेक खाजगी कंपन्याचे, कुठलेही वरिष्ठांनी आदेश दिले नसतानाही, तलाठी यांनी एका दिवसात बोगस फेरफार  घेऊन त्याच दिवशी मंडळ अधिकारी हे प्रमानीत करतात व ७/१२ देतात, व कंपन्या अवैध कोळशाचे उत्खनन करतात काय सुरु आहे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात पत्रकार परिषदेत विनोद खोब्रागडे यांच्या सरकारला रोखठोक सवाल  विचारणार असे सांगितले
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा येथील में कर्नाटक एम्टा कंपनी बेंगलोर व में कर्नाटक पावर कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बेंगलोर यांच्या विरुद्ध विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा व एक अपंग शेतकरी संतोष पुनवटकर यांनी  अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात, अपील केली,कंपनीने बोगस फेरफार करून अवैध कोळशाचे उत्खनन करीत आहे त्यांच्या विरुद्ध अपील दाखल केले असून कंपनी   ला नोटीस इशु झाले असून आज दिनांक ०७/१०/२०२५ ला सुनावणी होणार आहे,

तसेच बेलोरा येथील में अरबिंदो कंपनी हैद्राबाद लिमिटेड ही सुद्धा बोगस फेरफार करून अवैध कोळशाचे उत्खनन करीत आहे त्यांच्या विरुद्ध माननीय अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा व सात शेतकरी यांनी अपील दाखल केली असून नोटीस इशु झाले आहे. यांची सुनावणी दिनांक ०७/१०/२०२५ रोजी  होणार  आहे.तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील कुंसूबी येथील २४आदीवासी शेतकऱ्यांचा जमीनीवर ४२ वर्षांपासून में मानीकगढ सिमेंट कंपनी व आताची अल्टाटेक सिमेंट कंपनी अवैध चुनखडीचे उत्खनन करीत आहे.व बोगस फेरफार करून गावठाण सह गाव ताब्यात घेतले त्याचां विरुद्ध विनोद खोब्रागडे व २४ शेतकरी यांनी अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात अपील दाखल केली असून नोटीस इशु झाले आहे, व  दिनांक ०७/१०/२०२५ रोजी सुनावणी आहे.


जर लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार,मंत्री, शासन, प्रशासन, यांनी आपले अधिकार व कर्तव्ये बजावले असते, तर विनोद खोब्रागडे यांना मागील ३० वर्षापासुन नौकरीत राहुन कंपनी व अधिकारी विरुद्ध न्यायालयात अपील दाखल करुन संघर्ष करण्याची वेळ आली नसती शेतकरी व समाज बांधवांनी जागृत होणे व आपल्या न्याय व हक्कासाठी संघर्ष करावा आत्महत्या कुणीही करु नका जिवन अनमोल आहे.
 
भारतीय संविधानाचे अभ्यासक, (तलाठी) तथा सामाजिक कार्यकर्ते  विनोद खोब्रागडे वरोरा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या