चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा ;- मृत्युनंतर देह संपतो परंतू अवयवदान केल्यास आपण लोकांना नवीन जीवन देऊ शकतो.तर मृतदेह दान केल्यास नवीन संशोधन करू शकतो किव्हा वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी सराव करू शकतो.येणाऱ्या पिढी करिता नवे ज्ञान प्राप्त करू शकतो.‘मरावे परी देह अन् अवयवरूपी उरण्याचा प्रयत्न करावा’, अशीच मनात भावना ठेवून व सामाजिक जिव्हाळा निर्माण करून भंडाऱ्यातील नागपूरे कुटुंबियांनी 80 वर्षीय जयवंता नागपुरे यांचे मृतदेह हे त्यांचं मुलगा सुनील नागपुरे यांनी आईचे मृतदेह दान केले आहे.आणि इतर नागरिकांनी या कार्यसाठी समोर यावे असे आव्हान सुद्धा केले आहे.या प्रसंगी सुनील शहारे, संजय बोरकर,संजय मते,मारुती राऊत,सतीश पगाडे अन्य मित्रपरिवार यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
संजय मते , ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष
ज्या प्रमाणे नागपुरे कुटुंबियांनी मृतदेह दान केले आहे.तसेच मनात कुठल्याही प्रकारची कुंचित भावना न ठेवता सामाजिक बांधीलकी ठेवून वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सहकार्य केले आहे.त्याच प्रमाणे समाजातील इतर घटकांनी सुद्धा मृत्यू नंतर मृतदेह दान करावे व येणाऱ्या पिढी करिता नवीन ज्ञान प्राप्त व्हावे आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला सहकार्य करावे.


0 टिप्पण्या