चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेचा १४ वा वर्धापन दिन ११.११.२०२५ रोजी आहे. या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये संत मुक्ताई, जनाई, बहिणाबाई हरिपाठ मंडळांच्या हरिपाठ स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या निमित्ताने त्याच्या नियोजनाची बैठक आज चंद्रपूर येथे दि.08/10/2025 रोजी संपन्न झाली.
वारकरी साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त हरिपाठ स्पर्धांचे जे आयोजन करण्याचे ठरले आहे. हरिपाठ स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या महिला हरिपाठ मंडळांना अनुक्रमे एक ते पाच नंबर देण्यात येणार आहेत व उत्तेजनार्थ देखील नंबर आहेत त्यांना तीर्थक्षेत्र भेट बक्षीस रूपात देण्यात येणार आहे. अशी माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह. भ. प. विठ्ठल पाटील (काकाजी) यांनी दिली. त्यांच्या नियोजनानुसार राज्यातील ३६ जिल्ह्यामध्ये संत मुक्ताई, जनाई, बहिणाबाई हरिपाठ मंडळाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्याचाच एक भाग म्हणून आज चंद्रपूर जिल्ह्याची संत मुक्ताई, जनाई, बहिणाबाई हरिपाठ मंडळांची आढावा बैठक घेण्यात आली.
यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ह भ प देवराव महाराज ठावरी व ह भ प ज्योतीताई लांडगे ( जिल्हाध्यक्ष महिला चंद्रपूर )
ह भ प भारतीताई राजपगे (तालुका महिला अध्यक्ष जिवती) ह भ प राधाबाई उपरे (तालुका अध्यक्ष राजुरा ) ह भ प नथुराम महाराज पाटील (चंद्रपूर कार्याध्यक्ष) ह भ प मनीषाताई वरारकर(तालुका अध्यक्ष कोरपना ) ह भ प बाळकृष्ण घोडम (तालुका अध्यक्ष कोरपना)ह भ प अशोक तनफने (तालुका अध्यक्ष चिमूर) ह भ प पांडुरंग महाराज तनफने ( तालुकाध्यक्ष ब्रह्मपुरी) ह भ प दिवाकर वाघमारे ( तालुकाध्यक्ष राजुरा ) तसेच जिल्ह्यातील सर्व महिला व पुरुष तालुकाध्यक्ष उपस्थित होते. जिल्हा संपर्कप्रमुख खटावे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीचे सांगता पसायदानाने करण्यात आली.


0 टिप्पण्या