Ticker

6/recent/ticker-posts

लोकमान्य विद्यालय तथा क.म. भद्रावतीचे अमृतमहोत्सवी वर्ष


स्मरणिकेसाठी माजी विद्यार्थ्यांना लेख पाठविण्याचे आवाहन



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : लोकसेवा मंडळ, भद्रावती संचालित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावतीला यंदा 75 वर्षे पूर्ण होत असून, सन 2025-26 हे संस्थेचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे.
दिनांक 20 जानेवारी 2025 ते 20 जानेवारी 2026 या कालावधीत या महोत्सवी वर्षाचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्थेच्या या गौरवशाली प्रवासात शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेची अखंड परंपरा जोपासली गेली आहे. या प्रवासातील यशोगाथा, उपक्रम आणि कार्यकर्तृत्व यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्थेच्या ‘अमृतमहोत्सवी स्मरणिकेचे' प्रकाशन करण्यात येणार आहे.

या निमित्ताने लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या माजी विद्यार्थ्यांना विशेष आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपल्या शालेय आठवणी, अनुभव, शिक्षकांबद्दलच्या भावना तसेच संस्थेबद्दलचे विचार  हे थोडक्यात आणि अर्थपूर्ण लेखाच्या स्वरूपात पाठवावेत.
लेख मोबाईलवर टाईप करून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे  संस्थेचे सहसचिव अमित गुंडावार(9890253979),(सचिन सरपटवार(9922930147),प्राचार्य रूपचंद धारणे(8080479573) यांच्या भ्रमण ध्वनी क्रमांकावर तथा विद्यालयाच्या  पत्त्यावर  येत्या दहा दिवसाचे आत पाठविण्याचे आवाहन लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत  गुंडावार यांनी केले आहे.

ही स्मरणिका केवळ एक दस्तऐवज नसून, ती पिढ्या  न पीढ्या विद्यार्थ्यांच्या आठवणी, भावना आणि कर्तृत्वाची साक्षीदार ठरणार आहे, असे लोकसेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या