चित्रा न्युज प्रतिनिधी
करमाळा :-शनिवार 4 ऑक्टोबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट )महेश चिवटे हे सकाळच्या सुमारास त्यांचे करमाळा शहरालगत हिवरवाडी परिसरात शेतामधून करमाळा शहराकडे येत असताना त्यांच्या चार चाकी गाडीच्या समोर मोटरसायकल उभे करून हिवरवाडी येथील स्थानिक रहिवाशी मनोज लांडगे या युवकाने चिवटे यांना मारहाण करायला सुरुवात केली यामध्ये त्यांना
मुक्का मार लागलेला असून
करमाळा येथील तील कुटिर रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले .
परंतु हा हल्ला पूर्वनियोजित होता असे महेश चिवटे यांच्याकडून सांगण्यात आले. व यामध्ये दिग्विजय बागल, रशमी दीदी बागल यांचा हात असून त्यांनी या गुंडाला मला मारहाण करण्यासाठी पाठवले असे सांगण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे मला जीवे मारण्यासाठी त्या इसमाकडे गावठी कट्टा होता .असेही त्यांनी तक्रारीमध्ये म्हटलेले आहे.
परंतु या घटनेच बागल गटाकडून
तात्काळ खंडन करण्यात आले व हा हल्ला हा वैयक्तिक त्यांच्या आर्थिक देवाण घेऊन यातुन झालेला आहे .असे पत्रकार परिषद घेऊन नमूद करण्यात आले .पुढे वेलताना बागल गटाचे रमेश कांबळे यांनी सांगितले की हा लांडगे नावाचा मुलगा हा माझ्या हिवरवाडी या गावातील आहे. आणि या तरुण आणि चिवटे यांचे आर्थिक व्यवहार गेले अनेक वर्षापासून आहेत त्याच व्यवहारात काही रक्कम राहिले असल्यामुळे त्यांचे वारंवार भांडण होत होती .त्यातून महेश चिवटे यांनी राजकीय ताकद वापरून या लांडगे दलित कुटुंबाला दमदाटी केली व त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणून पोलिसांकडून ही धमक्या देण्यात आल्या. यामध्ये अर्था -आर्थी दिग्विजय बागल व रश्मी दीदी बागल यांचा कुठलाही संबंध नाही. महेश चिवटे यांच्याकडून या घटनेला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न होत आहे. असे सांगत त्यांनी बागल परिवार केलेले सगळे आरोपाचे खंडन केलेले आहे.
दिग्विजय बागल यांना एकनाथरावजी शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानसभेला तिकीट मिळाल्यापासून ते दिग्विजय बागल यांच्यावरती नाराज होते आणि त्यातूनच त्यांचा पुढे रोष वाढत गेला. परंतु आजचे घटना पाहता दोघांनी एकमेकाला मारहाण केलेला आहे लांडगे लाही डोक्याला जखम झालेली असून चिवटे यांनी त्यांना हानमार करत जातीवाचीक शिवीगाळ केलेली आहे. शिवीगाळ करत असताना लांडगे यांनी त्यांच्या हातातला मोबाईल काढून व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु
याउलट चिवटे यांनी . बागल यांच्यावरती बेछूट आरोप करत
त्याला राजकीय रंग दिला आहे .
राजकीय ताकद वापरून चिवटे हे लांडगे यांना गंभीर गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आम्ही कायदेशीर मार्गाने लढणार आहोत आणि महेश चिवटे यांच्या वरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार आहोत.
(चौकट )-
करमाळा तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार श्री जयवंतराव जी जगताप व त्यांचे दोन चिरंजीव यांचा एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतल्यापासून दिग्विजय बागल हे माझ्यावरती नाराज आहेत त्यातूनच ते सूड भावनेने माझ्यावर वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत .मागील आठवड्यात ही पुर परिस्थिती पाहणी करण्यासाठी गेलो असताना
दिग्विजय बागल माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते.
त्यामुळे आज झालेला भ्याड हल्ला हा पूर्वनियोजित होता व त्यांनी माझे रेकी करूनच माझ्यावर आज ठरवून त्या गुंडाकडून हल्ला करायला लावलेला आहे. परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आई कमला भवानीच्या कृपेने आज माझा जीव वाचला आहे.
श्री महेश चिवटे
शिवसेना( शिंदे गट) जिल्हाध्यक्ष .
(चौकट ) २
मी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेचा एक सच्चा शिवसैनिक असून मी करमाळा तालुक्यात गेल्या वर्षभरापासून शिवसेना वाढीचे काम मोठ्या प्रमाणावर करत आहे .गाव तिथे शाखा हे माझं स्वप्न आहे .आणि शिंदे साहेबांनी टाकलेली जबाबदारी मी
प्रामाणिकपणे पार पाडत आहे
तालुक्यातील अनेक नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश होतो आहे .हि माझ्यासाठी नक्कीच आनंदाची बाब आहे .कारण आपला पक्ष वाढतोय यात नक्कीच मी एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून मला आनंद आहे.
त्याचप्रमाणे महेश चिवटे हे शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे.
परंतु राजकीय सुडभावनेतुन किंवा काही गैरसमजातून ते माझ्यावरती बेछुटू आरोप करत आहेत .आणि मला सतत टारगेट करत आहेत .या विषयाची वरिष्ठांकडून दखल घेणे गरजेचे आहे.
श्री दिग्विजय बागल शिवसेना (शिंदे गट )नेते


0 टिप्पण्या