चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर : वर्धा ऑडिओ टॉनिक ( साऊंट अन्ड लाईटस ) प्रतिष्ठान, कवी के पाटील द्वारा आयोजित, सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित दिवंगत मंदाताई के पाटील यांच्या स्मरणार्थ दिनांक -10 नोव्हेंबर 2025 रोज सोमवारला सायंकाळी 6 वाजता स्थळ- विजया हॉल सावंगी मेघे वर्धा, येथे मोठ्या उत्साहात पार पडला. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील किरणापुर ( काचुरवाही ) भीम शाहीर प्रबोधनकार प्रदीप बागवान कडबे यांना रमाई गौरव पुरस्कार 2025 सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार विकास राजा, प्रबोधनकार सुभाष कोठारे, महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका प्रबोधनकार निशा धोंगडे, महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका प्रमोदिनी साठे, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक संगम कासारे, सुप्रसिद्ध गायिका वैशाली शेंडे, सुप्रसिद्ध गायक क्रांती मीनल, सुप्रसिद्ध गायक सदानंद मोरे अकोला, सुप्रसिद्ध गायक दिलीप शितोडे, सुप्रसिद्ध गायक क्रांती कुमार पंडित, सुप्रसिद्ध गायक राजेश भारती, सुप्रसिद्ध गायिका योजना कुकुडकर, गायिका मंदा वाघमारे, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक, दयानंद इंगळे, जीव तु चव्हाण, शिवाजी कांबळे, प्रबोधनकार मधुबावलंकार तेलंगणा, सुप्रसिद्ध गायक अरुण मेश्राम, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक - महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी के पाटील प्रबोधनकारकला साहित्य संघ वर्धा, सर्व गायक कलावंताचे आभार मानून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, मोठ्या संख्येने गायक कलावंत उपस्थित होते.


0 टिप्पण्या