Ticker

6/recent/ticker-posts

चंदनखेडा येथे रक्तदान शिबिरात केले 79 युवकांने रक्तदान


शिबीराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा येथे गुरुदेव प्रार्थना मंदिर परिसरात  गुरुवार दि.६ नोव्हेंबरला  समाज परिवर्तक तथा माजी उपसरपंच विठ्ठल रामकृष्ण हनवते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ७९ युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. या प्रसंगी संपूर्ण रक्तदात्यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ,पाणी कॅन देवुन सन्मान करण्यात आला.
विठ्ठल हनवते मित्र परिवार , बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट शौर्य क्रिडा मंडळ ,बिरसा बचत गट कोकेवाडा (मा)विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळ चरुर (धा) व समस्त गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने रामकृष्ण हनवते यांच्या वाढदिवसा निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते यांचे हस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष नागोराव ठावरी , प्रमुख अतिथी म्हणून पोलिस पाटील समीर खान पठाण,सुशिला हनवते, लताताई नन्नावरे, विकास दोहतरे, गुलाब भरडे, दयानंद जांभुळे, संतोष हनवते,प्रमुख मार्गदर्शक समाजसेवा अधिक्षक राकेश शेंन्डे व  रक्त केंद्र तंत्रज्ञ अमोल रामटेके यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली  होती. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. हनवते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा पुष्पगुच्छ,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो व ग्रामगीता देवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल हनवतेसुत्रसंचालन गणेश हनवते  तर उपस्थितीतांचे आभार शुभम भोस्कर यांनी मानले.
जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर,बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट, शौर्य क्रिडा मंडळ, महात्मा गांधी तंटामुक्त समिती,बिरसा बचत गट कोकेवाडा,विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळ चरुर धा.गुरुदेव सेवा मंडळ व समस्त गावकरी चंदनखेडा या शिवाय आशिष हनवते, महेश केदार, अमोल दडमल,रोशन मानकर,राहुल चौधरी, जगदिश निमजे, देवानंद निमजे, आकाश निमजे, महेंद्र गुरुनुले,राहुल कोसुरकार , स्वप्निल दडमल, भुषण वाटेकर,शंकर दडमल, दिलिप ठावरी, प्रज्वल बोढे, प्रमोद हनवते, स्वप्निल चौखे, आशिष बारतीने, अनिल हनवते, हुसेन शेख, रमाकांत दोहतरे,प्रकाश भरडे, अनिल भरडे,राकेश सोनुले, महेश सोनुले,स्वप्निल सोनवणे, देवानंद दोडके,अमोल महागमकार,वैभव गटलेवार, देविदास चौखे, मंगेश चौखे, मंगेश हनवते, पंकज मानकर, अजित हनवते, निखिल चौखे, रोहित केदार, वैभव झाडे, मयुर जांभुळे, सचिन श्रीरामे,अमर श्रीरामे,शरद केदार, हरिदास केदार,तन्मय झाडे,शुभम चौधरी, ईश्वर उरकांडे, अविनाश डुकसे,समिर मडावी, अंकित मानकर, आशिष हनवते यांच्या  सहकार्यातून सदरहु कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या