चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सात नोव्हेंबर हा शाळेचा पहिला दिवस सर्वत्र जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.जागतिक विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून भद्रावती पोलीस स्टेशन इथे पोलीस निरीक्षक योगेश पारधी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ए.पी.आय. मिश्रा साहेब, पी.एस.आय.तुमसरे साहेब व पोलिस हवालदार लेकेश नायडू साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. लोकांचे स्वास्थ सुधारणा करिता व जगाला प्रेरणादायी असा कार्यक्रम भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटलांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. त्यावेळी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष योगेश मत्ते व तालुका अध्यक्ष राजेंद्र पोईंनकर,महिला आघाडी अध्यक्षा सुनीता ठोंबरे तसेच भद्रावती येथील सर्व पोलीस पाटील व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या