Ticker

6/recent/ticker-posts

अरणगाव पंचायत समिती गणातून भाजपा युवा नेते मा. उपसरपंच अजित यादव निवडणुकीच्या रिंगणात...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- कर्जत जामखेड चे भूमिपुत्र सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अरणगाव पंचायत समिती गणातून सभापती प्रा. राम शिंदे साहेब व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे तरुण,तडफदार, युवा नेतृत्व युवकांचे आशास्थान म्हणून ओळखले जाणारे मा. उपसरपंच अजित यादव यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीत इच्छुक म्हणून सांगितले आहे.
       त्यांच्या या निर्णयामुळे गणातील राजकारणात नव्या समीकरणाची निर्मिती होण्याची चिन्हे दिसत आहेत. अजित यादव हे गेल्या 7/8 वर्षा पासून सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्याशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत. गेल्या काही वर्षा पासून सामाजिक क्षेत्रातही ते कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील लोकांना विविध समस्यांवर प्रशासन दरबारी समस्या सोडवण्यासाठी मदत केली आहे. सतत युवकांच्या संपर्कात  राहून त्यांनी अरणगाव गणांत मोठा जनसंपर्क वाढवला आहे. 
       प्रा. राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून अजित यादव यांनी अरणगाव गणातील शेतकरी व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत पाठपुरवठा करतात. त्यांच्यावर ग्रामस्थांचा विश्वास आहे या पार्श्वभूमीवर अजित यादव यांच्या उमेदवारीला स्थानिक जनते कडून व आरणगाव गणातून  सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या