सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जामखेडच्या सर्वांगीण विकासाची हमी दिली. "ही परिवर्तनाची लढाई आहे. मुख्यमंत्री असताना मी सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही," असे सांगत त्यांनी नागरिकांना विश्वास दिला. अहिल्याबाई होळकरांची जन्मभूमी असलेल्या जामखेडची "मक्तेदारी मोडण्याची वेळ आली आहे," असेही ते म्हणाले. धनुष्यबाण चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, जात-पात न पाहता धनुष्यबाणावर शिक्का मारा. जामखेडकरांनी कधी न पाहिलेला विकास मी करून दाखवणार आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या मागे मी जात नाही, पण विकास मात्र नक्की करून दाखवतो." शिंदे यांनी विविध योजनांचा उल्लेख करताना सांगितले की लाडकी बहीण योजना निर्बंध न लावता सुरूच राहील 70 हजारांहून अधिक रुग्णांना उपचारासाठी मदत देण्यात आली एस.टी. प्रवासात महिलांन साठी 50% सवलत लागू उच्चशिक्षित मुलींची फी माफ करण्याची तयारी डिपी प्लॅन, पाणीपुरवठा, गार्डन विकास यासह विविध विभागांचे काम वेगाने पूर्ण करण्यात येणार" एकदा मी शब्द दिला की मग कोणाचं ऐकत नाही तो शब्द पूर्ण करूनच दाखवतो," असे सांगून त्यांनी सभेत उत्साह निर्माण केला.
ही लढाई सत्तेची आहे; दोन तारखेला धनुष्यबाण चिन्हावर मतदान करून लाडकी बहीण उभी करा," असे आवाहन त्यांनी केले.
त्यावेळी प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, उपनेते राजू वाघमारे, बाबूशेठ टायरवाले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. शबनम इनामदार, तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, युवा नेते आकाश बाफना, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पायलताई बाफना यांसह सर्व शिवसेना उमेदवार, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या