चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड :-शहरात दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी घडलेल्या अत्यंत भीषण आणि अमानवीय घटनेने संपूर्ण शासन, प्रशासन आणि जागृत समाजाला हादरवून सोडले आहे. एका निरपराध बौद्ध मागासवर्गीय भगिनीवर वारंवार बलात्कार, सोन्या-पैशांची लूट आणि त्यानंतर फासावर लटकवून केलेला निर्घृण खून – ही केवळ गुन्हेगारी घटना नसून, हा स्पष्टपणे जातीय द्वेषातून झालेला भीषण अत्याचार असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
आरोपीने मुलीला घरी बोलावून घेऊन तिच्यावर अत्याचार केले, लूट केली आणि त्यानंतर तिचा खून करून मृतदेह फाशीला लटकवून आत्महत्येचा बनाव रचला. ही घटना १६ नोव्हेंबरला सायंकाळी घडली असतानाही, पोलिसांनी तब्बल दोन दिवस टाळाटाळ करून, प्रचंड जनदबाव व संघर्षानंतर १८ नोव्हेंबरला मध्यरात्री १२ नंतर गुन्हा दाखल केला.
*प्रशासकीय अनागोंदी आणि जिल्हाध्यक्षांची अभेद्य भूमिका*
डॉ.शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, विष्णुपुरी येथे घाईघाईने पोस्ट मॉर्टेम (PM) उरकण्याचा प्रयत्न सुरू होता. हॉस्पिटलमधील गैरकारभार आणि राजकीय दबावामुळे पीडित कुटुंब आणि समाजात तीव्र अविश्वास निर्माण झाला होता.
या गंभीर परिस्थितीत, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीआंबिरे पालमकर यांनी अत्यंत ठाम आणि संघर्षात्मक भूमिका घेत, प्रशासनाला स्पष्ट आव्हान दिले:
"गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारायचा नाही!"
"योग्य पोस्टमार्टम होईपर्यंत आम्ही येथेच बसणार!"
जिल्हाध्यक्षांनी तब्बल १६ ते १७ तास ग्रामीण पोलीस स्टेशन सिडको येथे ठिय्या मांडला. ते एक इंचही मागे हटले नाहीत, कुटुंबाच्या न्यायासाठी त्यांनी प्रशासनाशी थेट संघर्ष केला.
*पोलीस प्रशासनावर दबाव आणि बाळासाहेब आंबेडकरांची थेट दखल*
पोलीस प्रशासनाने वारंवार टाळाटाळ केली, कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारताच पोलिसांची बचाबची झाली. राजकीय दबाव स्पष्टपणे जाणवत होता. दबाब टाकण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बळ देखील बोलावले.
मात्र, समाज आणि वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व झुकले नाही.
संपूर्ण घटनाक्रम समजल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः जिल्हाध्यक्षांना फोन करून कठोर निर्देश दिले: "पोस्टमार्टमवर अविश्वास असल्यास त्वरित री-पोस्टमॉर्टम घाटी हॉस्पिटल, औरंगाबाद येथे करावा!"
या थेट आदेशामुळे पोलिसांना तातडीने मुलीचा मृतदेह औरंगाबाद येथे पाठवावा लागला. संघटनेच्या आणि राष्ट्रीय नेतृत्वाच्या ताकदीची ही प्रशासनाने घेतलेली दखल होती.
जनशक्तीचा विजय : मध्यरात्री १ वाजता गुन्हा दाखल!
ग्रामीण पोलीस स्टेशनवर शेकडो समाजबांधव, महिला आणि युवा टास्क फोर्सचे कार्यकर्ते दिवसभर उपस्थित होते. त्यांच्या "गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही!" या एकजुटीने पोलिसांवर प्रचंड दबाव निर्माण केला.
दिवसभराच्या संघर्षानंतर अखेर, *रात्री १ वाजता पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला.*
यामध्ये बलात्कार, खून, लूट, पुरावे नष्ट करणे आणि महत्त्वाचे म्हणजे SC/ST अत्याचार कायद्यान्वये (SC/ST ACT) कलमे लावण्यात आली.
जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर यांनी FIR ची प्रत हातात घेऊनच पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले. हे खऱ्या नेतृत्वाचे आणि बहुजनांच्या निडर, निर्भीड नेतृत्वाचे प्रतीक ठरले.
संघर्ष
या लढ्यामध्ये अर्धापूर तालुकाध्यक्ष विनय मोरे, दीपक मगर, आणि युवा टास्क फोर्सचे निखिल हौसरे, शुभम गजभारे, विजय मगरे यांनी प्रमुख सहभाग घेतला.
या घटनेने पुन्हा सिद्ध केले आहे की, संघर्षाशिवाय न्याय मिळत नाही!
आज पीडित भगिनीला न्याय मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे, तो फक्त – वंचित बहुजन आघाडीची एकजूट, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची दखल आणि जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर यांच्या ठाम लढ्यामुळे!
शासन-प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना कठोर शिक्षा करावी, ही लोकअपेक्षा आहे.
समाजासाठी आवाहन:
दलालांपासून आणि चमचेगिरीपासून सावध राहा!
निडर नेतृत्व ओळखा, त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहा


0 टिप्पण्या