Ticker

6/recent/ticker-posts

*भटक्यांच्या पालावर ही आता गुलाल पडू द्या मायबाप जनतेला नम्र विनंती :- राजू शिंदे...*

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून शहरातल्या वार्ड क्रमांक पाच मधून राजू सर्जेराव शिंदे यांच्या पत्नी सौ पूजा राजू शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत चिन्ह घड्याळ देऊन उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. राजू सर्जेराव शिंदे यांनी आतापर्यंत म्हणजे मागच्या सात वर्षात तालुक्यातील जवळपास 50 गावात तसेच जामखेड शहरात भटके विमुक्त,आदिवासी, गोरगरीब, कष्टकरी समाजाची कामे आणि समस्या सोडविण्याचा व परत कोणत्याही समस्या येऊ नयेत यासाठी अथान परिश्रम घेतले आहेत. आणि आजही ते त्यासाठी धडपडत आहेत. 
         राजू शिंदे यांच्या पत्नीला मिळालेल्या उमेदवारीबद्दल बोलताना राजू शिंदे म्हणाले. की आज वर आमच्या सात पिढ्या गेल्या पण डोक्यावरचे पाल काय गेलं नाही. पण आता वेळ आली आहे. या पालावर विजयाचा गुलाल पाडण्याची भटके विमुक्त समाजाच्या  अस्तित्वाच्या पहिल्या लढाईचा पहिला सेनापती ठरवण्याची आणि हा विजय भटक्या समाजासाठी नवी चेतना नवीन दिशा आणि नवीन भविष्य घेऊन येणारा ठरणार आहे. तरी सर्व समाज बांधवानी मतदारांनी आणि मायबाप जनतेने त्यांची सेवा करण्याची संधी आणि या लढाईला एक सेनापती द्यावा असं आवाहन केलं आहे.
      राजू शिंदे यांची आजपर्यंतची कामे: १२०० लोकांना मोफत जातीचे दाखले, तसेच आधार कार्ड, राशन कार्ड, मतदार कार्ड, जन्म दाखले, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक स साहित्य आणि इतर मदत त्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या