Ticker

6/recent/ticker-posts

संत चहाकार महाराज क्रीडा मंडळ तर्फे कबड्डी स्पर्धेचे आयोजन मातोश्री क्रीडा मंडळ बाळेगाव प्रथम क्रमांकाचे मानकरी



चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती :-तळेगाव दाशासर येथील  श्री संत चहाकार महाराज क्रीडा मंडळ  व गोपाल दत्ताजी काळे यांच्या स्मृती पित्यर्थ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन  सामाजिक कार्यकर्ते महेबुब ठेकेदार व भरती ताई चूटे ग्रामपंचायत सदस्य रमाकांत इंगोले उपसरपंच.संजय सारवे दिलीप पेंदाम गजानन शेंद्रे सुयोग ठाकरे (पत्रकार) व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले व सूत्र संचालन संतोष तायडे यांनी त अँकरिंग वंश ठाकरे यांनी केली आणि तळेगाव येथे चार दिवस चाललेल्या या कबड्डी स्पर्धेचे मातोश्री क्रीडा मंडळ बाळेगाव व जय हनुमान क्रीडा मंडळ चांदूरबाजार यांच्यात अंतिम सामना झाला ज्यामध्ये मातोश्री क्रीडा मंडळ बाळेगाव सामन्यात विजेतेपद पटकावले व मातोश्री क्रीडा मंडळ बाळेगाव   प्रथम स्थान  मिळाले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व  चषकासह .
.21000 रोख देण्यात आली  आणि  दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिक जय हनुमान क्रीडा मंडळ चांदूरबाजार या संघाला  15000 हजार रोख देण्यात आली यामध्ये तृतीय क्रमांक नवरंग क्रीडा मंडळ घुइखेळ चषकासह 10000 हजार रोख व चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक संतकृपा पिंपळखुटा यांना  5000 हजार रोख व चषक देण्यात आले. बेस्ट डिफेंडर बाळेगावचा सत्यम तर उत्कृष्ट रेडर  मिलिंद राठोड याला व बेस्ट ऑल राऊंडर विशाल उर्फ जादू यांना चषक  देण्यात आले. या कबड्डी स्पर्धेत ४० ते४५ संघांनी सहभाग घेतला. संघाचा उत्साह वाढवण्यासाठी DJ छत्रपती तळेगाव यांचा सुद्धा श्रमदानातून सहकार्य केले कबड्डी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी साहिल जामवले, यश विरूळकर, करण बगाडे, सौरभ चचाने, सचिन वधाडे  क्रिश जामवले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या