चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : -- अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य प्रदेश महासचिव तथा आदिवासी सेवक केशव तिराणिक यांचे सामाजिक संघठन संपर्क दौऱ्याप्रसंगी नाशिक येथील दिव्यांग कल्याण बहुउद्देशिय सामाजिक संस्थेस दिलेल्या सदिच्छा भेटी दरम्यान केशव तिराणिक यांचेसह संपुर्ण कुटुंबाचे संस्थेचे राज्य सरचिटणीस दिपक शेवाळे आणि संपुर्ण टीमसह प्रशस्तीपत्र देऊन यथेच्छ स्वागत सन्मानित करण्यात आले.
यावेळी केशव तिराणिक यांनी आपल्या सन्मानार्थ कृतज्ञता व्यक्त करून दिव्यांगांसाठी शासन स्तरावरून असलेल्या योजनेंतर्गत लाभासाठी सहकार्य सह काही सामाजिक घटकांकडून आथिर्क योगदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले मात्र यापूर्वीही तिराणिक कुटुंबातील सदस्यांकडून आणि नातेवाईकांकडून देणगी स्वरुपात आथिर्क मदत निरंतर देत असल्याचे केशव तिराणिक यांनी म्हटले आहे.


0 टिप्पण्या