,
चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड -:शासनाने गरिब लोकांना पक्के घर भेटावे पक्के छत भेटावे त्या करिता पंतप्रधान आवास योजना सुरू केली,आज वर 65,ते 70, टक्के गरिबांना पक्की घरे मिळाली, काही लाभार्थींना पैसेच पोहोचले नाही त त्याचे कारण एक तर हप्ता लवकर भेटत नाही आणि जर चेक काढायचा असेल तर,रिश्वत द्यावी लागते पहीलेच ग्रामीण भागात, एक लाख विस हजार रु मिळतातं त्या पैशांमध्ये अर्धं घरं ही बांधलं जातं नाही, हप्त्याचे चेक काढण्यासाठी चार ते पाच हजार द्यावें लागतात, नांदेड च्या पंचायत समिती कार्यालयात हा प्रकार सर्रास चालू आहे, क्लार्क पासून ते घरकुल अधिकारी इंजिनिअर प्रयत्न हा कारभार सुरू आहे, सर्रास फाईल खाली पैसे ठेवून द्या बिनधास्त कर्मचारी, अधिकारी म्हणताना दिसतात,तसे पैसे दिले नाही तर सरळ ह्या कामासाठी एवढे हजार रु त्या कामासाठी तेवढे हजार रु,रेट प्रत्येक कामाचा ठरलेला असतो ते सांगताना दिसत आहे त कार्यालयात आणि गोर गरीब लाभार्थीं पैसे देऊन काम होत नाही, तहसील कार्यालयात चकरा मारून बेजार होताना दिसत आहेत विजय चौडेकर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता यांनी प्रत्यक्ष रित्या जाऊन फोन वरती गोर गरीब जनतेची अशी बेकायदेशीर लुट करू नका त्या लोकांचे कामे करण्यासाठी च शासन तुम्हाला पगार देतो असं समजावण्याचा प्रयत्न केला तरी हे लोक इतके बेडर झालेले आहेत फोन बंद करतात यांचा मुजोरी पणा कुठ तरी थांबला पाहिजे,बर्याच लोकांनी घरं न बांधता पैसे उचलून घेतले, चिरीमिरी देऊन, काही गरीब लाभार्थींनी नाईलाजाने अधिकार्यांचे खिसे भरून हफ्ते उचलून घेतले जे लाभार्थी अतिशय गरीब परीस्थितीत जगतात,जसे विधवा,दिव्यांग हे वंचित आहेत हा घरकुल चा भ्रष्टाचार बराच फोफावत चालला आहे हा काहि प्रमाणांत थाबला पाहिजे अशी जनतेची व सामाजिक कार्यकर्ता, विजय चौडेकर यांची मागणी आहे, जेणेकरून जे घरकुलापासुन वंचित आहेत त्यांना पक्के घर मिळेल परंतु असा मोकाट भ्रष्टाचार होतोय तरी वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाही त हा काय सावळा गोंधळ आहे तेच जनतेला कळेनासा झालायं घरकुल बांधकामासाठी शासनाने वाळू उपलब्ध करून दिली ती वाळू घरकुल लाभार्थींना मिळतं नाही,तीच काळ्या बाजारात विक्री केली जाते काल परवा ची बाब आहे नायगाव येथे आ, पवार यांनी तहसील कार्यालयात घुसून भ्रष्टाचारी कर्मचार्यांचा तोंडी जवाब घेतला व्हिडिओ तयार करून वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषद C,E, O.श्रीमती मेघना कावली मॅडम यांच्या कडे आला त्यांनी तडकाफडकी कारवाई करण्याचे आदेश दिले, निलंबित करण्यात आले,असेच प्रकार बर्याच ठिकाणी सुरू आहेत, आणि त्यातच नांदेड तहसील कार्यालयात हा घरकुल भ्रष्टाचार चालू आहे शासनाचा पगार घेऊन जनतेची सेवा करन तर दूर त्यांची लुट करतं आहेत, तरी वरिष्ठ अधिकारी जिल्हा अधिकारी,मा,राहूल कर्डिले व जिल्हा परिषद C E O, श्रीमती मेघना कावली मॅडम साहेबांनी लक्ष केंद्रित करावे व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, जनता व सामाजिक कार्यकर्ता यांची मागणी आहे,


0 टिप्पण्या