चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-डाॅ. वर्गीस कुरीयण यांच्या जन्म दिनानिमित्त राष्ट्रीय दुग्ध दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर मार्फत नेकनाळ ता. देवणी येथे दूध व दुग्धजन्य पदार्थांचे महत्व यावर मार्गदर्शनपर कार्यक्रम व पनीर बनवण्याचे प्रात्यक्षिकाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डाॅ. अशोककुमार देवंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी मंचावर मार्गदर्शन करण्यासाठी डाॅ. मोहम्मद रझिउद्दीन, सहयोगी प्राध्यापक, डाॅ. प्रफुल्लकुमार पाटील, प्रक्षेत्र व्यवस्थापक तसेच प्रगतीशिल पशुपालक श्री. राजपाल बिराजदार हे उपस्थित होते. या मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. मोहम्मद रझिउद्दीन यांनी दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे महत्व सांगून प्रत्यक्ष पनीर बनवून प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी मानवी आहारात दुधाचे महत्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासासाठी पिंपरी येथील महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजपाल बिराजदार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. जयपाल राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डाॅ. मोहम्मद रझिउद्दीन, डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, श्री.राजपाल बिराजदार आणि डाॅ. जयपाल राठोड यांनी विशेष कष्ट घेतले.


0 टिप्पण्या