Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळी ग्रा.पं.ने लावले कॅमेरेउघड्यावर शौचास बसणा-यांचा होणार सत्कार..!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-घरी शौचालय आहे.व त्याचे १२०० हजाराचे अनुदान उचलले.तरी सुध्दा दररोज शेकडोजण मारोती मंदीर व स्मशान भुमी परिसरात हवा खात लोटा घेऊन उघड्यावर बसतात यामुळे गावाचे सौंदर्य व मंदीराचे पाविञ्य धोक्यात आल्याने जनतेत तीव्र नाराजी पसरली आणि कॅमेरे लावून मंदीराचे पाविञ्य आणि गावची इज्जत जपावे.अन् घरी असलेल्या शौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौचास बसणा-या महाशयावर योग्य ती कारवाही करावी,अशी मागणी सुज्ञ जनतेतून जोरदारपणे होऊ लागली.म्हणुन येथील कर्तबगार ग्रा.पं.प्रशासनाने जनतेच्या मागणीची तात्काळ दखल घेतली.आणि दि.२ रोजी मारोती मंदीर परिसरात सौर उर्जेवरचा फिरता तसेच मोठा आवाज देणारा सीसीटीव्ही कॅमेरा लावला.  
आणि आता यापुढे जो कोणी इसम उघड्यावर संडास केल्याचे सिध्द होईल त्याचा चौकात जाहीर सत्कार करण्यात येईल.अशी माहिती गावचे उपसरपंच बालाजी भोसले-पाटील यांनी दिली.                             याची थोडक्यात माहिती अशी की,  अनेक गावात स्मशान भुमी नाहीत. आणि असतील तर तेथे रस्ते नाहीत. पण उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या गावात मुस्लिम,वासुदेव,मातंग, बौध्द,गोसावी,जंगम आणि लिंगायत या समाजासाठी रस्त्यांसह स्मशान भुमी आहेत.व अठरा पगड जातीं - साठी सार्वजनिक स्मशानभुमी असलेले जिल्ह्यातील हंडरगुळी हे एकमेव गाव आहे.असे म्हणणे चूक ठरणार नाही.
येथील मारोती मंदीरा मागे आणि परिसरातली सार्वजनिक स्मशान भुमीकडे जायच्या रोडवर गावच्या कांही महाशयांनी घाण करुन मंदीर व सार्वजनिक स्मशानभुमी घाणीच्या विळख्यात लोटली आहे.यामुळे प्रेत स्मशानभुमीकडे घेऊन जाणा-यांना रस्त्यावरची घाण तुडवत तसेच घाण वास घेत जावे लागायचे.म्हणुन अंत्यसंस्काराला येणा-या बाहेरच्या मंडळींमधून गावच्या इज्जतीचे लक्तरे वेशीवर टांगली जायची.म्हणुन गंभीरपणे या बाबीची दखल ग्रा.पं.ने घेतली आणि सार्वजनिक स्मशान भुमी,मारोती मंदीर परिसरात दि.२ रोजी सौरऊर्जेवरील कॅमेरा बसवला असून हा कॅमेरा अलार्म (आवाज) वाजणारा आणि कनेक्टेड मोबाईल मध्ये फोटो वा संदेश देणारा आहे. तेंव्हा यापुढे कोणीही उघड्यावर शौचास बसू नये.आणि जो कोणी बसेल तो कॅमे-यात अडकेल.आणि मग त्याचा भर चौकात जाहीररित्या सत्कार करण्यात येईल.असा इषारा उपसरपंच बालाजी भोसले-पाटील यांनी सोशल माध्यमातून दिला आहे. तेंव्हा तमाम माता-भगीनी व पुरुष मंडळींनी या बाबत दक्ष राहावे आणि उघड्यावर घाण न करता घरातील शौचालयाचा वापर करावा.अन्यथा कॅमे-यामध्ये कैद होऊन आपली फजिती होणार नाही.याची काळजी, दक्षता जनतेनी घ्यावी.अशी विनंती उपसरपंच बालाजी भोसले-पाटील यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या