चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-एकदा रफी साहेबांच्या रूहानी आवाजावर प्रसिद्ध संगीतकार नौशाद साहेबांनी म्हटले होते -
गूंजते हैं तेरे नगमों से अमीरों के महल
झोपडी में भी गरीबों के तेरी आवाज है
खरंच म्हटले होते नौशाद साहेबांनी. काही प्रतिभा झोपड्यांमध्ये जन्म घेतात, पण अफसोस की त्यांचा कोणी मददगार किंवा वाली बनून समोर येत नाही आणि अखेर ती प्रतिभा दम तोडते. अशीच एक मासूम प्रतिभा आहे गोपाळ समाजातील १५ वर्षीय प्रभात भगवान जाधव, जो भंडारा जवळील झबाडा (मानेगाव बाजार) मध्ये आपल्या फाटक्या झोपडीत आपल्या संगीताच्या शौकामुळे जसे-तसे कॅशियोवर आपल्या बोटांनी जुने, नवीन गीत वाजवत होता, पण गेल्या वर्षापासून या प्रतिभेला किडनीच्या गंभीर आजाराने आपल्या आगोशात घेतले, आरोग्य खूप कमजोर होऊन त्याच्या उपचारासाठी कधी जिल्हा हॉस्पिटल तर कधी नागपूरच्या सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलची खाक छानत त्याचे आई-वडील फिरत आहेत. सारे पैसे उपचारात गेले. कधी रफी साहेबांच्या तर कधी इतर गायकांच्या, चित्रपटांतील गीतांच्या धुन तयार करून प्रभात लग्न, गणेश, दुर्गा व अन्य कार्यक्रमांत कॅशियो वाजवत असे, पण आजारामुळे हे सगळे थांबले आहे. फाटकी झोपडी, साप-विंचू, कीडे यांच्या सहवासात आई-वडील झाडू बनवून, मजुरी करीत आपले, परिवाराचे पोट भरत आहेत, कोणाची ही मदत नाही, उपचारात सर्व पैसे खर्च झाले. आरोग्यामुळे प्रभातची १० वीची शिकवणी थांबली आहे. त्याचा छोटा भाऊ बादल ८ वी तर छोट्या जुळ्या बहिणी (४ थ्या वर्गात) शिकत आहेत. गेल्या ६० वर्षांपासून या समाजाचे लोक येथे झबाडा (सिल्ली जवळ) राहत आहेत, अनेक वेळा घरकुलासाठी ग्रा. पं. पासून तर भंडारा एसडीओ, जिल्हाधिकारी, सामा. न्याय विभाग इ. कडे निवेदन दिले पण काही झाले नाही, लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी कुणीही येथे ढुकून पाहत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. दोन-तीन वेळा ग्रीन हेरिटेज सोशल फाउंडेशनने या झोपडपट्टीवासियांसोबत दिवाळीत मदत केली होती. दोन वेळा हेरिटेजच्या निवेदनावर भंडारा येथील दी भंडारा महिला नागरी सहकारी पत संस्था अध्यक्षा श्रीमती डोरले मॅडम यांनी या सर्व झोपडपट्टीवासियांच्या महिला, पुरुषांना सीएसआर निधीतून कपडे, साड्या, शालेय साहित्य इ. उपलब्ध करून दिले होते. आधार, मतदान कार्ड, रेशन कार्ड असूनही हे घर टॅक्स, वीज बिल देतात पण सुविधा काही नाही. यापेक्षा मोठी त्रासदी काय होऊ शकते. त्यांच्या होनहार मुलाच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे, मानवतेच्या नात्याने अशा गरजू, निर्धन, वंचितांची मदत करण्यासाठी समाज_प्रहरिंनी पुढे यावे असे ग्रीन हेरिटेज सोशल फाउंडेशन भंडारा कडून आवाहन करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या