एका झटक्या सुरू झाले काम
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : नवीन बस स्टँडच्या समोरील काळे कृषी केंद्र ते पोस्ट ऑफिस पर्यंत अनेक वर्षा पासून रस्ता खराब असल्याने नागरिकांना रहदारी करण्यास योग्य नव्हता. त्यामुळे त्या ठिकाणी अनेक नागरिक जीव मुठीत घेऊन जाणे येणे करीत होते.ही बाब माधव जीवतोडे यांचे लक्षात आली आणि त्यांनी लगेच भद्रावतीचे मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी यांच्या निदर्शनास आणून दिली. की हा जीवघेना रस्ता कायमचा बंद करण्यात यावा.आणि तसा शासकीय आदेश काढल्यास आम्ही आपणास मदत करण्यास तयार राहू. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी मोबाइल वर पाठविलेल्या निवेदनाची दखल घेऊन वेळेचा विलंब न लावता मंजूर रोडचे आणि नाली चे कामाला सुरवात केली.ही एक नागरिकांसाठी अभिनंदनीय बाब आहे.
त्यांच्या या कर्तृत्वाचे सामाजिक कार्यकर्ते माधव जीवतोडे आणि मुख्याधिकारी यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत असून त्यांचे दिलीप ठेंगे, दिलीप मांढरे, विनायक येसेकर, राजू गैनवार, बापुराव एकरे. सुधीर मुडेवार, नरेश काळे, अनील मोडक यांनी अभिनंदन केले आहे.


0 टिप्पण्या