चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नीती आयोग अमरावतीच्या वतीने जोशी सभागृहात आचार्य परमानंद तिराणिक यांना ' राज्यस्तरीय आर्टिस्ट ऑफ द इयर ' अवॉर्ड २०२५ ! हा मानाचा पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री आदरणीय कमलाताई गवई लेडी गव्हर्नर, अमरावती. यांच्या हस्ते सन्मानचिन्ह मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला अनेक नाट्य क्षेत्रातील व चित्रपटातील कलावंतासह, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी लेखक,साहित्यिक,कवी,प्राध्यापक, डॉ. राजू डांगे,श्रीमती शोभा हरिभाऊ कंकाळे, प्रेमिला डोंगरे, समाजसेविका श्रीमती संजीवनी काळे,अपूर्वा बन मॉडेल नागपूर,वैभव निमकर प्रसिद्ध व्याख्याते, सलील भाई घाणिवाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त आचार्य परमानंद तिराणिक यांनी दिव्यांग व्यक्तींच्या विषयावर आधारित 'या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी' या दर्दनाक मन भरून येणारा एकपात्री अभिनय सादर केला.परमानंद तिराणिक यांनी केलेल्या माध्यमातून पन्नास पैशाच्या पोस्ट कार्डवर स्वहस्तलिखित सुंदर अशा हस्ताक्षरात 'संविधानाची उद्देशिका' लिहून गाव पातळीवर व शालेय स्तरावर घर- घर संविधान ही मोहीम राबवली.तसेच आदिवासी वारली चित्रकला भिंतीवर रेखाटून निर्जीव भिंती बोलक्या केल्या.स्वच्छ गाव,सुंदर गाव, नशा मुक्ती अभियाना अंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने व्यसनमुक्त समाज यासाठी विशेष पोस्टर स्पर्धा राबवून जनजागृती केली वसुंधरेची संवर्धन करणे या उपक्रमांसह अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबविल्याबद्दल या पुरस्कारास ते पात्र ठरले. या पुरस्कार सोहळ्याच्या मुख्य संयोजिका अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा माधुरी चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या पुरस्कार सोहळ्यात राज्यभरातील विविध जिल्ह्यातील नामवंत कलाकार,कलावंत उपस्थित होते.


0 टिप्पण्या