उपसरपंच यांच्या आमरण उपोषणाची लेखिपत्रकने सांगता
चित्रा न्युज प्रतिनिधी
मारेगाव : तालुक्यात येत असलेल्या वनोजा (देवी) येथिल जानामाय कासामाय या देविच्या पवित्र परिसरात चौपाटीवर दि.२९ आक्टोंबर पासून सामाजिक कार्यकर्ते,वनोजा देवी येथिल उपसरपंच व शिवसेना शिंदे गटाचे उपतालुकाप्रमुख प्रशांतकुमार प्रकाशचंदजी भंडारी हे जनतेच्या हिताच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले होते.
सदर या उपोषणा पुर्वी उपसरपंच प्रशांत भंडारी यांनी संबंधीत प्रशासनाला अनेकवेळा वनोजा देवी येथील गावातिल ग्रामपंचायतच्या कामाच्या संदर्भात असोवा परीसरातील कामाच्या पुराव्यासह लेखी तक्रार अर्ज दिले होते. पण या सुस्त प्रशासन अधिकारी यांनी कुणाच्या तरी दबावाखाली यांच्या तक्रारीची चौकशी न करताच उलट यांचे वरच आरोप करत त्यांच्या अर्जावर कोणतीच दखल घेत नसुन केराची टोपली दाखव होते. हे बघून उपसरपंच यांना नाई लाजास्तव आमरण उपोषणाचा मार्ग पत्कारावा लागला आणि दि. २९ ऑक्टोंबरला आमरण उपोषणाला वनोजा देवी येथील चौपाटिवर बसले यांच्या उपोषणाला परीसराती जनतेचा व लोक प्रतिनिधी यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून आणि उपसरपंच यांनी एक नोव्हेंबरला चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेताच अखेर सुस्त प्रशासकीय अधिकारी खडबळुन जागे झाले अन कोणताही अनुचित प्रकार घडण्या आधीच सर्वच प्रशासकीय अधिकारी उपोषण स्थळाला भेट देऊन प्रशासनाले उपोषण करते प्रशांत भंडारी यांच्या मागण्या मंजुर करुन नमावे लागले.
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी दि.३१ आक्टोंबरला रात्री ८-०० ते ९.३० च्या दरम्यान लेखीपत्रक देऊन तहसिलदार उत्तम निलावाड यांच्या हस्ते सदर उपोषणाची ज्युस पाजून सांगता करण्यात आली.
सदर उपोषण हे वनोजा (देवी) येथिल पाण्याचा प्रश्न हर घर नल,हर घर जल नळ आहे पण नळाला पाणी नाही त्याकरिता पाणी मिळत नसल्याने पाणी मिळणे,राज्य महामार्ग क्र.३१७ व इतर गावाला जोडणारे रस्ते खड्डेमय असल्यामुळे सार्वजानिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत येणारे मार्ग दुरुस्त करण्याची मागणी व दुतर्फा झाडे झुडपे काढण्याची मागणी,वाहतूक विभागाने अतीभार घेऊन जाणाऱ्या वाहतुकीने रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असल्याने त्या वाहतुकीवर बंदोबस्त करणे,परिसरात अवैध दारू व अवैध धंदे बंद करण्याकरिता देवि परिसरात पोलिस चौकी देणे व इतर मागण्या घेऊन उपोषणाला बसले होते.
या सर्व मागण्याचे काम सुरू करा किंवा लेखीपत्रक तरी द्या या विषयाला धरून प्रशांतकुमार भंडारी यांनी उपोषणला सुरूवात केली होती.काम एवढ्या लवकर सुरू होणे शक्य नसल्याने तहसिलदार उत्तम निलावाड यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व विभागांकडून लेखीपत्रक देऊन उपोषणकर्त्याच्या आमरण उपोषणाची सांगता केली असून उपोषण सांगताच्यावेळेस सार्वजनिक बांधकाम विभागचे उपअभियंता सुहास ओचावार,पोलिस निरीक्षक शाम वानखडे, शिवसेना तालुकाप्रमुख विशाल किन्हेकार, तालुका समन्वयक संजय आवारी,युवा उपतालुकाप्रमुख विकास वैद्य,मारेगाव शहर प्रमुख विजय मेश्राम, सुनीलभाऊ गेडाम माजी जिल्हा परिषद सदस्य,वनोजा देविचे माजी सरपंच जनार्धन गाडगे, माजी सरपंच व आजी ग्रा.पं.सदस्य सुधाकर धांडे वनोजा देवी,परिसरातील ग्रामस्थ,सामाजिक कार्यकर्ते आदेश तातेड तसेच महिला पत्रकार प्रतिभा तातेड हे उपस्थित होते.
उपस्थितांसक्षम तहसिलदार उत्तम निलावाड यांच्या हस्ते ज्यूस पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली परंतू काही कारणास्तव गटविकास अधिकारी भिमराव वहंखंडे यांनी उपोषणाच्या सांगातानंतर भेट दिली असून लवकरच तुम्ही मागलेल्या मागणीवर कार्य सुरू करून समस्या मार्गी लावू असा शब्द दिला.
----------------------------------------
एवढ्या वर्षात कुणीही गावाच्या विकासाचा विचार केला नाही.
एवढ्या वर्षात प्रथमच कुणीतरी गावाच्या विकासाचा विचार केलाय,नाहीतर आजपर्यंत गावाचा विचार कोणीच केला नाही,या उलट जे निवडून आलेत त्या साऱ्यांनीच स्वतःच्या स्वार्थाचा विचार केलाय.
जरी,या मागण्या मान्य व्हायला वेळ जरी लागेल तरीही वनोजा गावाच्या प्रगतीचा,विकासाचा कुणी तर विचार केला पाऊल तरी टाकलं म्हणून प्रशांत भाऊ यांच्या या कार्याला माझा सलाम आणि त्यांच्या पुढील यशस्वी मार्गक्रमणाकरिता खूप खूप शुभेच्छा.
सौ. मनीषा दुलीचंद राऊत (शिक्षिका) वनोजा देवी ता. मारेगाव जि. यवतमाळ


0 टिप्पण्या