Ticker

6/recent/ticker-posts

म्हैस चोरीच्या आरोपीसह ३,६५०० रुपयांचा मुद्देमाल वाढवणा पोलीसां च्या ताब्यात



चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी:-वाढवणा पोलिस ठाण्यात दिनांक १४.१०.२५ रोजी गुरनं.२७०/२५ कलम ३०३(२) बीएनएस अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपासात मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने सपोनी.एस. पी.गायकवाड,पोउपनी.हालसे तसेच नळगीर बीटचे पो.ह.इकराम उजेडे, अंमलदार बळदे,बोइनवाड,यांनी माहिती काढून मुराद मौलासाब खादूभाई रा.नळगीर ता.उदगीर या आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करताच त्याने गुन्हा केला असे कबूल केले म्हणुन सदर म्हैस चोरी प्रकरणातील वरील आरोपीस २ नोव्हेंबर रोजी अटक केल्यानंतर आरोपीने गुन्ह्यातील ६० हजार रु. ची १ म्हैस व ५ हजार रु.चे १ वासरु चोरुन ते कंधार जि.नांदेड येथे दिले असल्याचे कबूल केल्याने कंधार येथून १ म्हैस व १ वासरु पोलिसांनी हस्तगत केले.तसेच यापुर्वी देखील गावातील सलगरे यांचे (गुरनं.१५२/ २५)२ म्हैस चोरी केल्याचे कबूल केले आहे.आरोपीने गुन्ह्यात वापर केलेले एमएच.०५ बीएच १९२१ हे ३ लाख रुपयाचे बोलेरो पीकअप टेंम्पो सह ६५ हजारांचे म्हैस,वासरु या मुद्येमालासह आरोपी वाढवणा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.या आरोपीने आणखीन कांही गुरांची चोरी केलीय का?या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या