Ticker

6/recent/ticker-posts

प्रभाग आकरा मधील शेतकरी बांधवांना कृषीच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आ रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार :- अपुर्वा गिरमे...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- जामखेड नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आसुन याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे जश जशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे तस तसे प्रचाराची रंगत वाढली आहे याच आनुशंगाने जामखेड नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग क्रमांक अकरा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उच्च शिक्षित उमेदवार अपुर्वा अमोल गिरमे व हरिभाऊ आजबे हे आ. रोहीत पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवित आहेत.
     प्रभाग अकरा मधील नागरीकांशी गिरमे परिवाराची कृषीच्या माध्यमातून नाळ जोडली आहे तसा अपुर्वा ताईंना परिवाराचा राजकीय वारसा आहे आणी कृषी क्षेत्रात या परिवाराचे तालुक्यासाठी मोठे योगदान आहे राज्य पातळीवरील आदर्श शेतकरी पुरस्कार या कुटुंबाला मिळालेला आहे त्यामुळेच प्रभागातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जामखेड नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या शासकीय योजनांचा आता लाभ मिळत नाही तो मिळवुन देण्यासाठी आ.रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नक्की प्रयत्न करणार असल्याचे उमेदवार अपुर्वा गिरमे यांनी सांगितले आहे.
      त्यामुळे प्रभागामध्ये आसलेला शेतकरी बांधव आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आसा आत्मविश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते अमोल गिरमे यांनी वाटत आसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या