Ticker

6/recent/ticker-posts

जामखेड नगरपरिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकवणार असल्याचा ऋषिकेश बांबरसे व गणेश आजबे यांनी केला विश्वास ठाम...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- जामखेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने आदर्श जामखेड करण्यासाठी आदर्श वचननामा जाहीर केला आहे. प्रभाग ११ मधील अहोरात्र जनतेच्या अडिअचणीत कायम जनतेच्या सेवेत असणारे शिवसेनेचे उमेदवार ऋषिकेश किसन बांबरसे व गणेश आजबे सर्व समावेशक, शांत, संयमी,बहूजन विचाराचे व्यक्तिमत्व असणारे उमेदवार आहेत. केलेल्या कामाच्या बळावर त्यांचा विजय पक्का आहे आता फक्त मताधिक्य किती मिळणार हे पहाणे बाकी आहे 

 नगरसेवक ऋषिकेश बांबरसे व नगरसेवक गणेश आजबे हे माजी नगरसेवक आहेत. आता गणेश आजबे यांच्या सौभाग्यवती शाखुबाई गणेश आजबे व ऋषिकेश किसन बांबरसे हे प्रभाग क्रमांक ११ मध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ पायलताई आकाश बाफना या आहेत. नगरसेवक असतांना ऋषिकेश बांबरसे व गणेश आजबे यांनी वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांचा लाभ पाठपुरावा करून प्रभागातील लोकांना मिळवून दिला. जामखेड ते जमादारवाडी रस्ता केला. जामखेड ते बटेवाडी रस्ता केला. घरकुल योजना प्रत्येक गरजुला मिळवून दिले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभागातील लोकांना मिळण्यासाठी पाठपुरावा केला.प्रभागातील गरजु, वंचित लाभार्थ्यांना विविध शासकीय योजना मिळवून देणे,विविध दाखले रेशनकार्ड, विधवा महिलांना डोल चालू करून देणे असे अनेक कामे स्वतः पदरमोड करून लोकांचे करून दिले आहे. ऋषिकेश बांबरसे यांचे वडील किसन बांबरसे हे जामखेड ग्रामपंचायतचे सरपंच होते. किसन बांबरसे यांनी सरपंच काळात जामखेडला सामाजिक जातील सलोखा जपण्याचे काम केले. व्यवसायासाठी गाळे बांधले. वाड्या वस्तांवर रस्ते करण्याचे काम केले. वडीलांच्या कामाचा ऋषिकेश किसन बांबरसे यांना मोठा फायदा होत आहे. यामुळे प्रभाग ११ मधुन त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे. महिला व तरूण वर्ग. जेष्ठ जूने नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सतत लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतात. यामुळे या निवडणुकीत सर्वसामान्य मतदार ठामपणे उभा दिसत आहे. नागरिकांमधून ऋषिकेश बांबरसे व शाखुबाई गणेश आजबे यांच्याबाबत सकारात्मक चर्चा ऐकायला मिळत आहे 

चौकट - जामखेड नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवणार आसल्याने तुम्ही सामिल व्हा आसे आवाहन ऋषिकेश बांबरसे व गणेश आजबे यांनी सर्व मतदार बंधू-ःभगिनींनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या