चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-नळाचे नवीन स्मार्ट मीटर लावण्याच्या संबंधाने भंडारा नगर परिषदेने नळ योजनेचे जे नियमित ग्राहक आहेत त्यांना दीड हजार रुपये भरण्याबाबत सूचित केलेले होते आणि ज्यांचे मीटर खंडित झालेले होते किंवा नवीन जोडणी करायची आहे त्यांना तीन हजार पाचशे रुपये भरावयाचे होते. त्यात जे प्रामाणिक ग्राहक आहे त्यांनी वरील प्रमाणे ची रक्कम नगर परिषदेकडे जमा केलेली होती .परंतु, काही नागरिकांनी या गोष्टीला विरोध केलेला होता आणि त्यानंतर कोणीही नगरपालिकेला वरील प्रमाणेची रक्कम भरली नाही, त्यांचे म्हणणे असे होते की नळाला नवीन स्मार्ट मीटर देण्याची जबाबदारी ही नगर परिषदेची आहे. त्यानंतर ग्राहकांची ही समस्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक 22 जून 2025 च्या ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये मांडली, की ज्यांनी प्रामाणिकपणे नगर परिषद भंडारा कडे रुपये दीड हजार किंवा 3500 ही रक्कम भरली ती एक तर नगर परिषदेने ग्राहकाला परत करावी किंवा त्या रकमेचे समायोजन करण्यात यावे. त्यावर तत्कालीन मुख्याधिकारी यांनी सदरची रक्कम समायोजित करण्यात येईल असे सांगितले. आणि मा . जिल्हाधिकारी भंडारा तथा अध्यक्ष, ग्राहक संरक्षण परिषद यांनी त्यावर नगरपरिषद भंडाराचे मुख्याधिकारी यांना तसे करण्याबाबत निर्देशित केलेले होते.अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी पुनश्च सतत याबाबत पाठपुरावा केला आणि या कार्याला यश प्राप्त झाले. आता नुकतेच झालेले नळाचे बिल आले त्यात समायोजन करावयाची रक्कम दर्शविण्यात आलेली आहे.
परंतु थकबाकी वर अधिभार शुल्क दाखविण्यात आलेले आहे .ही बाब संयुक्तिक नाही आणि तसे मुख्याधिकारी यांना लक्षात आणून दिल्या जाईल.


0 टिप्पण्या