Ticker

6/recent/ticker-posts

आपल्या मर्यादित शहरात ट्राफिक कंट्रोल करणे सोपे आहे.. फक्त चूक करणाऱ्या वाहनधारकांची तपासणी करावी, प्रत्येक व्यक्तीला थांबवून ट्राफिक जाम करू नये,


चित्रा न्युज प्रतिनिधी 
  नांदेड : -दंड जरूर लावावा. विनाकारण वाहने थांबून तपासणी करू नये. सांगळे साहेबाच्या पॅटर्ननुसार प्रत्यक्ष हातवारे करून पॉईंटवर उभे राहून ट्राफिक कंट्रोल करावी. शहरातली फक्त दहा ते बारा चौकात ट्रॅफिक जाम होते. काटेकोरपणे ट्राफिक कंट्रोल केल्यास बराच त्रास कमी होईल. फक्त आयटीआय चौक वगळता बाकी सगळ्या चौकांचे ट्राफिक सुशोभीकरण थंड बस्त्यात पडले आहे. यात लोकप्रतिनिधींची भूमिकाही महत्त्वाची आहे. शिवाय बांधकाम खाते व महापालिकेचा समन्वय ट्रॅफिक विभागाशी असणे आवश्यक आहे. दंड लावून ट्रॅफिक सुधारते हे अर्धसत्य आहे.  सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ट्राफिक मधील मनुष्यबळाचे काटेकोर नियोजन ही आवश्यक आहे. शहरात एखादी व्हीआयपी मुव्हमेंट असल्यानंतर जशी ट्राफिक क्लिअर केली जाते तशा  प्रकारची  सतत ट्राफिक पेट्रोलिंग काही चौकात व शहरातील काही भागात आवश्यक आहे. संबंधित विभागाने शहरातील आठवडी बाजाराच्या सीमा आखून  द्याव्यात .. बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूचे  कॉलर भरलेले नाहीत.ते बांधकाम विभागाने भरावेत. शहरात काही ठिकाणी गतिरोधकही आवश्यक आहेत. सिग्नल चे टाइमिंग सुरळीत करणे आवश्यक. जोपर्यंत तिन्ही विभाग काटेकोर समन्वय साधून नियोजन करणार नाही तोपर्यंत ही समस्या कायम राहणार आहे. ट्राफिक जाम झाल्यानंतर ती सुरळीत करण्यापेक्षा जाम होणार नाही याची काटेकोर काळजी घ्यावी लागणार आहे. सन्माननीय ट्राफिक पोलिसांच्या ट्राफिक सुधारण्याबाबत    काही सूचना अत्यंत उपयोगी असतात त्याचाही विचार होणे आवश्यक. कारण प्रत्यक्ष फिल्डवर काम करताना त्यांना आलेले अनुभव ट्राफिक सुधारण्यासाठी कामाला येतात. सर्वांना शिस्त आवडते फक्त शिस्त लावणारे हवेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या