हंडरगुळी :-येत्या कांही दिवसात होणा-या निवडणुकीसाठी वाढवणा गटातल्या हंडरगुळी पं.स.गण हा यंदाही ओपन पुरुषासाठी सुटल्याने या निवडणुकी मध्ये पण गावकी-भावकी हा फॅक्टर निर्णायक ठरणार का?याकडे गणात असलेल्या गावाचे लक्ष लागले आहे.
कारण,२०१७ च्या निवडणुकीत हा गण ओपन पुरुष असा सुटला होता. पण काॅंग्रेसवाल्यानी अख्खा गट ताब्यात घेण्यासाठी हंडरगुळीत मोठी भावकी असलेल्या महिलेला पुरुषाच्या जागी तिकीट दिले आणि अख्खा गट इंकाॅंने ताब्यात घेतले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गाव पातळीवर राजकिय समीकरणा मध्ये गावकी-भावकी हा घटक पुन्हा एकदा ढळढळीतपणे डोकावू पाहत आहे.
कारण,२०१७ च्या निवडणुकीमध्ये हंडरगुळी गण ओपन पुरुषासाठी सुटला असताना केवळ इंकाॅं पक्षाने गावकी-भावकीचा विचार केला.अन् पुरुषाच्या जागेवर गावात नामांकित असलेले व मोठी भावकी असलेले कुटूंबातील १ महिलेला उमेदवारी दिली.आणि ती मतदारांनी,भावकीने मते दिल्याने विजयी झाली.केवळ ही १ जागा न जिंकता तालुक्यामध्ये फक्त वाढवणा गटातील तीनही जागा इं.काॅं.पक्षाने जिंकल्या होत्या.आणि आता येणा-या निवडणुकीत सुध्दा २०१७ चाच फाॅर्म्यूला राबवण्याच्या विचारात स्थानिक काॅंग्रेसवाले आहेत.ते पण ओबीसी पुरुषाच्या जागेवर जि.प.करीता OBC डाॅक्टर महिलेला रिंगणात उतरविण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वासू सुञाकडून मिळाली आहे.
माञ,दरवेळेस पुरुषाच्या जागेवर महिलेलाच का संधी द्यायची?पुरुष उमेदवार नाहीत का?असे सवाल सुज्ञ मतदारातून चर्चीले जात असले तरीही घोडा मैदान जवळच आहे. बघू काय होतेय ते.


0 टिप्पण्या