Ticker

6/recent/ticker-posts

आमदार रोहित पवार यांना सरकार घाबरतय का? एकट्याला घेरण्यासाठी अख्खं सरकार जामखेडमध्ये का उतरतंय?

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- एखाद्या नेत्याची ताकद कशावरून मोजायची? तर त्याचा विरोधक त्याला हरवण्यासाठी किती मोठी फौज उभी करतात, यावरून! आज जामखेडमध्ये जे चित्र दिसत आहे, ते पाहिल्यावर एकच प्रश्न पडतो, सत्ताधाऱ्यांना आमदार रोहित पवारांची एवढी भीती का वाटते?
      जामखेड नगरपरिषद ही तशी स्थानिक स्वराज्य संस्था. पण या निवडणुकीसाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रचाराच्या मैदानात उतरावे लागते, यातच रोहित पवारांचा पहिला विजय आहे. जे काम स्थानिक नेत्यांच्या ताकदीवर व्हायला हवे, तिथे राज्याच्या प्रमुखांना पाचारण करावे लागते, याचा अर्थ स्पष्ट आहे की, राम शिंदे यांची स्थानिक पकड सैल झाली असून, त्यांना आता रोहित पवारांच्या नावाची धडकी भरली आहे.
      या निवडणुकीत दोन विचारांचा सामना आहे. एकीकडे भाजप आणि राम शिंदे यांनी उभे केलेले गुन्हेगारी क्षेत्रातील गुन्हेगार, ज्यांच्याकडे अफाट काळी माया  आणि धनशक्तीचा माज आहे. तर दुसरीकडे रोहित पवारांनी दिलेले उमेदवार हे सर्वसामान्य घरातील आणि उच्चशिक्षित आहेत. जनतेने गुंडांच्या हाती सत्ता द्यायची की सुशिक्षितांच्या, हाच खरा प्रश्न रोहित पवारांनी उभा केला आहे. आणि नेमकं हेच भाजपला पचनी पडत नाहीये.
माजी मंत्री राम शिंदे यांची अवस्था सध्या अत्यंत केविलवाणी झाली आहे. रोहित पवारांचा एखादा साधा कार्यकर्ता जेव्हा त्यांच्यावर टीका करतो, तेव्हा राम शिंदे आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा त्या सामान्य कार्यकर्त्यावर तुटून पडते. एका सामान्य कार्यकर्त्याला दाबण्यासाठी जेव्हा एवढा मोठा नेता आपली ताकद वापरतो, तेव्हाच सिद्ध होतं की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ही दादागिरी, हा दबाव म्हणजे पराभवाच्या छायेतून आलेली अस्वस्थता आहे.
आज चित्र असं आहे की, रोहित पवारांना हरवण्यासाठी स्थानिक पातळीवर भाजप, शिवसेना, वंचित, काँग्रेस आणि अगदी राष्ट्रवादीचा (अजित पवार गट)अशी 'महा-खिचडी'शिजवली जात आहे. केवळ रोहित पवारांना रोखण्यासाठी हे सगळे मतभेद विसरून एक झाले आहेत. करोडो रुपये फेकून नेते विकत घेतले जात आहेत. पण नेते विकत घेता येतात, जनता नाही, हे राम शिंदे सोयीस्कररीत्या विसरत आहेत.
सत्ताधाऱ्यांनी कितीही ताकद लावली, साम-दाम-दंड-भेद वापरला, तरी रोहित पवारांसारख्या विकासकामांवर भर देणाऱ्या नेत्याला रोखणे आता अशक्य कोटीतील गोष्ट आहे. कारण ज्यांच्या पाठीशी स्वाभिमानी जनता उभी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या