Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळीच्या तिरु नदीत बेशरमाचे अतिक्रमण


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी:—उदगीर तालुक्यातील सर्वात मोठी व ५२ गाव पाणी पुरवठा करणारी या ठिकाणच्या तिरु नदीचे सौंदर्य पुर्ण पणे धोक्यात आल्याचे सामान्य जनतेला दिसते.पण संबंधित यंञणे ला दिसत नसल्याने आश्चर्य वाटते. तालुक्यात सर्वात मोठी नदी म्हणुन ओळख असलेल्या तिरु नदी पाञात बेशरम या जातीच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.व या बेशरमामुळे नदीचे पाञ पुर्णपणे प्रदुषित झाले असून या बेशरमाच्या पाण्याचा वापर करणा-यांपैकी नवजात व कोवळी मुलांंच्या अंगाला खाज सुटत असल्याचे समजते. म्हणून याबद्दल आवाज उठवूनही या नदीच्या दुरावस्थेकडे संबंधित खाते जाणुन-बुजून लक्ष देत नसल्यामुळे जल व निर्सगप्रेमींमध्ये तसेच समस्त हाळी-हंडरगुळीकरामध्ये नाराजीची भावना निर्माण झाली असून या नाराजीचा उद्रेक होण्यापुर्वीच तिरुचे पाञ स्वच्छ,सुंदर करावे,ही मागणी जनतेची आहे.
यंदा या परिसरात मोठ्याप्रमाणामध्ये पाऊस झाल्याने या नदीला २ मोठे पूर येऊन गेले.माञ या नदीत पाण्या ऐवजी बेशरमाची झाडीच दुर पर्यंत दिसते.या बेशरमामुळे नदीचे सौंदर्य धोक्यात आले.आणि पाण्याऐवजी प्रदुषणाची पातळी सध्या वाढली आहे.यामुळे हे दुषित पाणी मानव व गुरांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरण्यापुर्वी याकडे संबंधिताने त्वरीत लक्ष द्यावे.आणि तिरु नदीचे पाञ स्वच्छ व सुंदर बनवावे.अशी मागणी जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या