चित्रा न्युज प्रतिनिधी
नाशिक:- राज्यात 3 लाख टन खरेदी केलेल्या कांद्याचे, शेतकरी बांधवांचे 200 कोटी रुपये अडकले आहेत. राज्यातील कांदा विकून सहा महिने झाले आहेत, तरी राज्यातील शेतकरी बांधवांना पैसे मात्र मिळाले नाहीत, शेतकरी थेट दिल्लीत, शरद पवारांना भेटले आहेत. राज्यातील नाफेड व एन.सी.सी.एफ.ने खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे शेतकरी बांधवांना अद्याप मिळाले नाहीत. याच मुद्यावरुन राज्यातील शेतकरी बांधवांनी आज दिल्लीत खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे.
कांदे विकून सहा महिने झाले, पैसे मात्र मिळाले नाहीत, शेतकरी बांधवांचे पैसे अडकले आहेत. खासदार भास्कर भगरे यांनी शेतकऱी बांधव यांची शरद पवार यांच्यासोबत भेट घालून दिली आहे. नाफेडकडून विकलेल्या कांद्याचे पैसे काढून द्या, म्हणून शेतकऱी बांधव यांनी शरद पवार यांना विनंती केली आहे. खासदार शरद पवार यांनी शेतकऱी बांधवांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. खासदार भास्कर भगरे यांनी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना पैसे मिळवुन देण्यासाठी आग्रही भूमिका घेतलेली आहे. 15 जून ते 2 ऑगस्ट 2025 या कालावधीत शेतकऱी बांधवांनी यांनी नाफेडला कांदे विकले होते. यामध्ये तब्बल तीन हजारहून अधिक शेतकऱी बांधवांचे यांचे पैसे अडकले आहेत. नाफेड एन.सी.सी.एफ.कडे हे पैसे अडकले आहेत.
राज्यातील तीन लाख टन कांदा खरेदी करून ही राज्यातील शेतकरी बांधवांचे कांदा पिकांचे कोटयावधी रुपये थकीत ठेवलेले आहेत. शेतकरी बांधव आजमितीला या राज्यातील व्यापारी लोकांमूळे अडचणील सापडले आहेत. केंद्राच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व ’एनसीसीएफ’ या दोन नोडल एजन्सी यांनी प्रामुख्याने महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये तीन लाख टन कांद्याची खरेदी पूर्ण केली. मात्र, सहा महिने होऊनही थकीत 200 कोटी रुपये मिळाले नसल्याने , राज्यातील शेतकरी बांधवांनी तातडीने 200 कोटी रूपये शेतकऱी बांधवांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी सरकारकडे केली आहे, व राज्यातील खासदार शरद पवार यांना भेटून शेतकरी बांधवांचे कांदा खरेदी केलेले पौसे लवकरात लवकर मिळावे ही मागणी केली आहे.
राज्यातील शेतकरी बांधवांकडून 3 लाख टन कांदा खरेदी झाल्यानंतर 72 तासांच्या आत राज्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर थेट पैसे देण्याची घोषणा सरकारने केली होती. आज राज्यातील हजारो शेतकरी बांधवांचे 200 कोटी रूपये अडकले आहेत. केंद्र सरकार शेतकरी बांधवांचे नाव पुढे करून ग्राहक हितासाठी कांद्याची खरेदी करते. या योजनेअंतर्गत राज्यांतील कांदा खरेदी झाल्यानंतर 72 तासांच्या आत शेतकऱी बांधवांच्या बँक खात्यावर थेट पैसे देण्याची घोषणा राज्यातील सरकारकडून करण्यात आली होती. एकीकडे राज्यात 2025 च्या मे महिन्यात कांदा खरेदी सुरू होणे अपेक्षित होती; मात्र 2025 च्या जुलै व ऑगस्ट महिन्यांत कांदा खरेदी प्रक्रिया उरकण्यात आली. राज्यात कांदा खरेदीनंतर सहा महिने उलटले असून, अद्यापही त्याचे पेमेंट राज्यातील शेतकरी बांधवांना मिळालेले नाहीत.
आज राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत, कारण मागील कांदा विकलेला पैसा अजुन मिळाला नाही ,त्यामूळे शेतकरी मोठया संकटात सापडला आहे. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहेत. कारण गेल्या सहा महिन्यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याचे अद्यापही पैसे शेतकऱी बांधवांना मिळालेले नाहीत. नाफेड आणि एन.सी.सी.एफ.ने शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी केली होती. मात्र, अद्यापही शेतकरी बांधवांचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे , याच कारणमूळे राज्यातील शेतकरी बांधव आक्रमक झाले आहेत. आज राज्यातील जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या प्रकरणात आपण लक्ष घालून पैसे मिळवून द्यावेत असी विनंती देखील राज्यातील शेतकरी बांधवांनी खासदार शरद पवार यांना केली आहे.


0 टिप्पण्या